मुंबई/पुणे

Floating Solar Project: आता मुंबईतील बत्ती नाही होणार गुल; ७ जलाशयांवर उभारण्यात येणार फ्लोटिंग सोलार प्रकल्प

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BMC And Mahapreets 2500 MW Floating Solar MoU :

महाप्रितच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुंबई महानगरपालिकेसोबत २५०० मेगावॅट फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेसोबत झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या पृष्ठभागावर फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभारून २५०० मेगावॅटची विद्युतनिर्मिती करण्यात येणार आहे. या जलाशयांमध्ये भातसा, तानसा, मोडक-सागर, मध्य वैतरणा, विहार, तुलसी आणि पवई यांचा समावेश आहे. (Latest News)

या प्रकल्पाच्या वीजनिर्मितीमुळे मुंबई शहराची ५० % विजेची मागणी सौरहरित ऊर्जेवर पूर्ण होणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प होणार आहे. कोकण रेल्वेसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे एकात्मिक शीतगृह प्रकल्पात दोन हजार टन क्षमतेचा निर्याताभिमुख कृषी उत्पादन पूरक शीतगृहाची उभारणी करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे कोकणातील उत्पादित होणाऱ्या नाशवंत शेतीमाल व मासे दीर्घकाळासाठी साठवणूक व टिकवून ठेवण्यासाठी तसेच निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना व कोळी बांधवांना मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्तर उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. मागासवर्गीय घटकांना प्राधान्याने यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

दुधनी व वापे हे भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील गावे असून याठिकाणी १००% सौरऊर्जेचा वापर करुन कार्बन न्युट्रल गावे म्हणून यांना नावलौकिक मिळणार आहे. या प्रकल्पास केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून मदत मिळालेली आहे. पुढील १२० गावांमध्ये हा प्रकल्प भविष्यात राबविण्यात येणार आहे. “मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान योजना” याअंतर्गत लघु व मध्यम उद्योगांसाठी भांडवलाशिवाय रुफ टॉप सोलार सयंत्र उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या योजनेव्दारे आधी सुमारे ४०० मेगावॅट रुफ टॉप सौर ऊर्जा निर्माण होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लघु व मध्यम उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळाल्यामुळे लाभ मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

शेतकरी हळहळले! विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यु,10 लाखांचे नुकसान

Kothimbir Vadi: पावसाळ्यात बनवा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी; हटके रेसीपी

Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

SCROLL FOR NEXT