Lok Sabha Election 2024: 'या' ६ जागांवरून महायुतीच्या चर्चेची घडी बसेना; अमित शाह सोडवणार तिढा?

Bjp Lok Sabha Election 2024 : राज्यातील ४८ पैकी ४२ जागांबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. पण ६ जागांवरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात बरेच मतभेद आहेत. त्या कोणत्या आहेत या सहा जागा जाऊन घेऊ.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Tv

Lok Sabha Election 2024 Mahayuti Seat Confusion :

देशात लोकसभा निवडणुकाच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत, परंतु देशभरात निवडणुकांचे वातावरण झाले आहे. जागावाटपासाठी नेते मंडळींचे बैठक सत्र सुरूय. महायुती आणि इंडिया आघाडीच्या नेतेमंडळी राज्यातील जागावाटपासाठी बैठकांवर बैठका घेत आहेत. अद्याप महायुती आणि आघाडीमधील जागावाटपावरील तिढा असून सुटेला नाहीये. विविध जागांवर महायुतीच्याच्या पक्षांकडून करण्यात आलेल्या दाव्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील ६ जागांमुळे महायुतीच्या चर्चेची घडी बसत नसल्याचं म्हटलं जात आहे. कोणत्या आहेत या सहा जागा जाऊन घेऊ.(Latest News)

या जागावाटपाचा प्रश्न सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर जागावाटप निश्चित केलं जाईल असं म्हटलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज रात्री होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सहा जागांवरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ४८ पैकी ४२ जागांबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. पण ६ जागांवरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात बरेच मतभेद आहेत. त्यात नाशिक, परभणी, सातारा, शिरूर, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे हे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातात हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले? बीड आणि कोल्हापूरमध्ये कोणाला मिळणार संधी? पाहा लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com