Mahanand dairy organization may operated by NDBB and shift to other state Mahanand
मुंबई/पुणे

Mahanand Dairy: राज्यातील महत्त्वाची 'महानंद' संस्था देखील परराज्यात जाणार? राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Mahanand Dairy News: महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद एनडीडीबीला चालवण्यात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ⁠संचालक मंडळाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ⁠

प्रविण वाकचौरे

Mahanand Dairy News:

राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याची टीका होत असताना आता राज्यातील मोठी संस्था परराज्यात जाणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. राज्यातली प्रमुख सहकारी दूध संस्था महानंदचा कारभार परराज्यात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महानंद डेअरी आता एनडीडीबी चालवणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद एनडीडीबीला चालवण्यात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ⁠संचालक मंडळाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ⁠राज्य सरकारच्या मंजुरीनंतर महानंद डेअरी एनडीडीबीला देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (Latest News Update)

⁠महानंद डेअरीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. महानंद एनडीडीबीला देण्याऐवजी राज्यातील सक्षम सहकारी दूध संघास महानंद चालवण्यास देण्यात यावा अशी मागणी, सहकारी दूध संघाने केली आहे. ⁠

'महानंद'चं महत्त्व

  • महानंद ही महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था.

  • महानंदमार्फत राज्यातल्या सहकारी दूध संघांच्या दुधाची खरेदी, विक्री, प्रकिया केली जाते.

  • महानंदचं कार्यक्षेत्र राज्यात आहे, प्रामुख्याने मुंबईत.

  • सहकारी संस्थाचं दूध घेऊन त्यांना योग्य भाव देण्याचं काम महानंद करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठ....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

SCROLL FOR NEXT