Students eagerly await the Maharashtra SSC Result 2026 as the board prepares to announce Class 10 scores online today. Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; 'या' अधिकृत वेबसाईटवर पाहा तुमचे गुण

maharashtra board 10th class ssc results 2026 update : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. mahahsscboard.in आणि इतर अधिकृत संकेतस्थळांवर आपला SSC Result 2026 ऑनलाइन पाहू शकतात. DigiLocker वर डिजिटल गुणपत्रिकाही उपलब्ध होणार आहे.

Namdeo Kumbhar

SSC 10th Result 2026 Maharashtra board MSBSHSE : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना दहावीचा निकल पाहता येणार आहे. त्याआधी निकालासंदर्भात सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात अधिकृत परिषद आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहायला मिळेल. mahahsscboard.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (Maharashtra Board will declare SSC Class 10 results on May 8 at 1 pm on mahresult.nic.in.)

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ४८० मुलं, ७ लाख ४७ हजार १३६ मुली परीक्षेला बसल्या होत्या. आज अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार असून दुपारी निकाल पाहाता येणार आहे.

10 वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.

1) https://results.digilocker.gov.in

2) https://mahahsscboard.in

3) https://sscresult.mkcl.org

4) https://results.targetpublications.org

5) https://results.navneet.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical Store: महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?

मुलासाठी बिबट्याला भिडला बाप, मृत्यूच्या जबड्यातून मुलाची सुटका

Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णन उपमुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलं

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

मोठी बातमी! नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक|VIDEO

SCROLL FOR NEXT