Crime News Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई गोवा महामार्गावर वन विभागाची माेठी कारवाई; दाेन ट्रकसह एक काेटीचा माल पकडला

वन विभागाने दाेघांना ताब्यात घेतलं आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

महाड : गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियावरुन जंगली वनस्पती पासून तयार करण्यात आलेले कात सदृश्य पदार्थ व पावडरची तस्करी होणार असल्याची माहिती महाड (mahad) वन विभागाला (forest department) मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाने छापा टाकून दोन ट्रक (truck) जप्त केले आहेत. या ट्रकची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये कात सदृश्य खडे व पावडरच्या गोणी आढळून आल्या. (mahad crime news)

वन विभागाने त्यांना मिळालेल्या माहितीनूसार मुंबई गोवा महामार्गावर पाळत ठेवली. पोलादपूर (poladpur) येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर दोन ट्रक जात असताना त्यांना थांबवण्यात आले. ट्रकची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये कात सदृश्य खडे व पावडरच्या गोणी आढळून आल्या.

सर्व गोणी जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर ट्रक चालक दीपक किशोर घोसाळकर (राहणार बोरज, खेड) आणि सचिन मंगेश कदम (राहणार खोपी, खेड) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा सर्व माल एक कोटीचा असून दोन ट्रक देखील वन विभागानं ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी वन संरक्षित कायदा ४१ आणि ४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेला वनपोज फॉरेनसिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT