Maha Vikas Aghadi Seat Sharing For Maharashtra Assembly Election Saam TV
मुंबई/पुणे

Vidhan Sabha Election : लोकसभेची चूक विधानसभेत सुधारणार; महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे महत्वाचे ६ निकष

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून जागावाटपाचे ६ महत्वाचे निकष समोर आले आहेत.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत बांधलेल्या वज्रमुठीचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. ४८ पैकी तब्बल ३१ जागा जिंकत त्यांनी राज्यात मोठी मुसंडी मारली. आता विधानसभा निवडणुकीतही अशीच एकजूट ठेवून लढण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केलाय. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी खास रणनिती आखली आहे.

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरवला आहे. यात जागावाटपात मोठी तडजोड करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस विधानसभा निवडणुकीत १०० ते १०५ जागा लढवणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ९० ते ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवार यांचा पक्ष विधानसभेत ८० ते ८५ उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. जागावाटपाच्या या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार हाच फॉर्म्युला कायम राहण्याची शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत काही झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून केला जाणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांकडून सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार कोणत्या उमेदवाराला कुठून उमेदवारी देण्यात यावी हे ठरवलं जाणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे महत्वाचे ६ निकष

  • सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपासाठी ६ महत्वाचे निकष ठरवले आहेत. ते कोणते पाहुयात...

  • जिथे ज्या पक्षाची जास्त ताकद असेल, त्या जागेवर त्याच पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला जाईल.

  • सध्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात काँग्रेसची जास्त ताकद आहे, त्यामुळे इथे काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे.

  • कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात उद्धव ठाकरेंची मोठी ताकद असल्याने या विभागात त्यांना सर्वाधिक जागा मिळतील.

  • शरद पवार यांच्या पक्षाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जातील.

  • लोकसभेच्या जागावाटपावेळी सांगलीसारख्या चुका टाळण्याचा तिन्ही पक्षाचा प्रयत्न असेल.

  • लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीने लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BPCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १,६२,९०० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

SCROLL FOR NEXT