Maha Aarti on behalf of MNS in the triumph of 'Jai Shriram' on the occasion of Shri Ram Navami
Maha Aarti on behalf of MNS in the triumph of 'Jai Shriram' on the occasion of Shri Ram Navami प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Dombivali : श्रीराम नवमीनिमित्त 'जय श्रीराम'च्या जयघोषात मनसेतर्फे महाआरती...

प्रदीप भणगे

डोंबिवली: डोंबिवलीत श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून शहरात विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. दरम्यान श्रीराम नवमी (Shreeram Navmi) निमित्ताने डोंबिवलीच्या गणेश मंदिरात आणि श्री राम मंदिरात भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Maha Aarti on behalf of MNS in the triumph of 'Jai Shriram' on the occasion of Shri Ram Navami)

हे देखील पहा -

श्रीराम नवमी निमित्ताने मनसेतर्फे महाआरती -

डोंबिवलीत (Dombivali) मनसेने श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून इंदिरा चौकात चलचित्राचा देखावा उभारला आहे. तसेच मनसेतर्फे (MNS) आज महाआरती करण्यात आली आणि यावेळी फटाके वाजवत जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. 'जय श्रीराम' घोषणामुळे इंदिरा चौक परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी मनसे डोंबिवली शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कल्याण आणि दिव्यात भाजपतर्फे रॅली -

श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून कल्याण आणि दिवा शहरात भाजपतर्फे भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तर डोंबिवलीत शिवसेनेतर्फे गीत रामायण हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

रोटरी विश्वनाथ मेमोरियल हेल्थ फाउंडेशनची स्थापना -

श्रीराम नवमी निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, डोंबिवली पूर्व आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी विश्वनाथ मेमोरियल हेल्थ फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी तज्ञ डॉक्टरस गरजू रुग्णांसाठी विविध आजारांवरील वैद्यकीय शारीरिक तपासण्या व त्याचे योग्य निदान ओपीडी माध्यमातून करणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT