Kalyan: मराठी शाळा टिकविण्यासाठी शारदा विद्यामंदिर शाळेची विद्यार्थी शोध मोहीम

Kalyan Latest News: मातृभाषेतून शिक्षण घेतले तरी भवितव्य उज्‍जवल होते असे समुपदेशन पालक वर्गासोबत शिक्षक करतात अशी माहिती शाळेचे शिक्षक आर. डी. पाटील यांनी दिली आहे.
Student search campaign of Sharda Vidyamandir School to sustain Marathi school
Student search campaign of Sharda Vidyamandir School to sustain Marathi schoolप्रदीप भणगे

कल्याण: इंग्रजी शाळांच्या वाढत्या गर्दीत मराठी शाळा झाकून गेल्या आहेत. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असल्याने गेल्या दहा वर्षांपासून मराठी शाळांना जणू घरघर लागली आहे. एकेकाळी पालक मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यायचे, आता मात्र मराठी (Marathi) शाळेत (School) प्रवेश घेण्यासाठी पालकांना साकडे घालावे लागत आहे. (Student search campaign of Sharda Vidyamandir School to sustain Marathi school)

हे देखील पहा -

Student search campaign of Sharda Vidyamandir School to sustain Marathi school
तब्बल 4 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया!

मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक घटत असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा टिकवणे हे शिक्षकांसाठी मोठे आव्हान आहे. मात्र कल्याणमधील (Kalyan) शारदा विद्या मंदिर शाळेने या आव्हानाला पेलण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे. या शाळेने 'विद्यार्थी शोध मोहिम' सुरु करुन मराठी शाळा टिकविण्याचा चंग बांधला आहे. शाळा सुटल्यावर शिक्षकांच्या या मोहिमेला सुरुवात होते. त्यांच्या या मोहिमेला काही प्रमाणात यश येतंय, दर वर्षाला शाळेत 100 ते 150 विद्यार्थी वाढतायत.

मराठी शाळेला विद्यार्थी मिळत नसल्याने मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांच्या तुकड्या विशिष्ट विद्यार्थी पटसंख्या नसल्याने बंद केल्या जातात. तुकड्या बंद झाल्या की, शिक्षकांची संख्या अतिरिक्त ठरते. विद्यार्थी संख्या कमी कमी होत तुकड्या बंद होत जातात. त्यामुळे शाळा सुरु ठेवायची की बंद करायची अशी स्थिती येते. ही स्थिती टाळण्यासाठी शारदा विद्यामंदीर शाळेने गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थी शोध मोहिम सुरु केली.

Student search campaign of Sharda Vidyamandir School to sustain Marathi school
ठाकुर्ली रेल्वे यार्डातून अभियंत्याचं अपहरण, तीन तासांतच सुटका; नेमकं काय घडलं? वाचा...

कोरोना काळात या मोहिमेला खंड पडला. कारण कोरोना काळात शाळा ऑनलाईन होती. आत्ता शाळा सुरु झालेल्या आहे. शाळेने मार्च महिन्यापासून विद्यार्थी शोध मोहिम सुरु केली आहे. इंग्रजी माध्यमातच नव्हे तर मातृभाषेतून शिक्षण घेतले तरी भवितव्य उज्‍जवल होते असे समुपदेशन पालक वर्गासोबत शिक्षक करतात अशी माहिती शाळेचे शिक्षक आर. डी. पाटील यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com