ठाकुर्ली रेल्वे यार्डातून अभियंत्याचं अपहरण, तीन तासांतच सुटका; नेमकं काय घडलं? वाचा...

Thakurli Crime News: दहा लाख रुपये खंडणी न दिल्यास नोकरी घालविण्याची तसेच ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.
railway engineer kidnapped from thakurli railway yard
railway engineer kidnapped from thakurli railway yardSaam Tv

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली यार्डात (Thakurli Railway Yard) कार्यरत असलेल्या २६ वर्षीय मोहित कल्लू सिंह यांचे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ४ व्यक्तींनी अपहरण (Kidnapped) केले. यानंतर त्यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्या सुटकेसाठी १० लाख रुपयाची खंडणी (Ransom) मागितल्या प्रकरणी डोंबिवली रेल्वे (Dombivali Railway Police) पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मात्र मोहित यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखत रेल्वेच्या कंट्रोल रूमला फोन करत घटनेची माहिती दिल्यानंतर कंट्रोलमधून मोहित यांच्याशी संपर्क साधत तो ड्युटीवर असल्याची खात्री करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. यामुळे अपहरणकर्त्यांनी आपल्याला सोडून दिल्याचे मोहित याचे म्हणणे आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी लवकरच हाती लागतील असे डोंबिवली पोलिसांनी सांगितले. (railway engineer kidnapped from thakurli railway yard)

हे देखील पहा -

railway engineer kidnapped from thakurli railway yard
अंगडिया खंडणी प्रकरण: सौरभ त्रिपाठी यांच्या पाठोपाठ वडीलही फरार घोषित

नेहमीप्रमाणे मोहित सिंह मंगळवारी ठाकुर्ली रेल्वे यार्डातील कार्यालयात रात्रपाळी करत असताना रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आलेल्या अज्ञात ४ व्यक्तींनी आपल्याला जबरदस्तीने कार्यालयातून हाताला पकडून खेचत बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीत बसवले आणि दहा लाख रुपये खंडणी न दिल्यास नोकरी घालविण्याची तसेच ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यांनतर मोहित यांच्या पत्नीशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्याकडे पतीच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी केली. मात्र मोहित यांच्या पत्नीने पोलीस कंट्रोलला फोन करून तत्काळ मदत मागितल्याने नियंत्रण कक्षातील पोलिसांनी मोहितच्या मोबाईलवर संपर्क साधत आपण कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगताच अपहरणकर्त्यांनी आपल्याला रात्री २ वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली स्थानाकाबाहेर सोडल्याची फिर्याद मोहित यांनी रेल्वे पोलिसात नोंदवली आहे.

railway engineer kidnapped from thakurli railway yard
नागपुरात पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक; आयुक्तांवर फोडलं पाणी टंचाईचं खापर

दरम्यान याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुकुंद ढगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढला असून लवकरच आरोपी हाती लागतील आणि नेमके अपहरण का केले याचा उलगडा होईल असे सांगितले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com