Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Viral Video : "मी पोलिसांचा मुलगा" पुण्यात तरुणाचा भररस्त्यात गोंधळ, VIDEO व्हायरल

Pune Viral Video News पुण्यातील नारायण पेठेत किरकोळ धक्क्यावरून तरुणांमध्ये वाद झाला. "मी पोलिसांचा मुलगा" असं म्हणतं वाद वाढवणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा

  • "मी पोलिसांचा मुलगा" म्हणत वाद अधिक तीव्र

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचा तातडीने हस्तक्षेप

  • दारू पिऊन वाहन चालवला का याची तपासणी सुरू

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एका तरुणाने भररस्त्यात धिंगाणा घातला. मात्र एवढ्यावरच न थांबता या तरुणाने "मी पोलिसांचा मुलगा आहे" असं म्हणतं दुसऱ्या तरुणाशी जोरदार वाद घातला. सदर घटना रात्री रात्री ११.१५ वाजता पुण्यातील नारायण पेठेत घडली असून पोलिसांनी मध्यस्थी करत हा गोंधळ थांबवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुण्यातील नारायण पेठेत असलेल्या टकले हवेली चौक येथे चैतन्य विजय काळे (वय- 40) हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते तेव्हा त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी वाहनाने धडक दिली. या चारचाकी चालकाचे नाव जितू सुजित हलदर (वय -22) असे आहे. तो मूळचा मध्य प्रदेशचा असून एअर फोर्स चे शिक्षण घेत आहेत. किरकोळ धक्का लागल्याने काळे आणि हलदर यांच्यात वाद सुरू झाले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली.

हलदर सोबत त्याच्या गाडी मध्ये ३ इसम व दोन मुली होत्या. हा वाद सुरू असताना त्याने "मी पोलिसांचा मुलगा" आहे असं सांगत हा वाद आणखी वाढवला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर हा वाद मिटवला आणि दोघांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत याबाबत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

तसेच कारचालक याने दारू प्यायली होती का यासाठी त्याची ब्रेथ अनिलायझर टेस्ट करण्यात आली. तसेच कारचालक याने दारू प्यायली होती का यासाठी त्याची ब्रेथ अनिलायझर टेस्ट करण्यात आली. या टेस्ट मध्ये तो दारू प्यायला नसल्याचे आढळून आले. शिवाय या तरुणाची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय चाचणी केली असून चाचणी निगेटिव्ह आली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातातील दोघांची एकमेका विरुद्ध काही तक्रार नसल्याने तसे त्यांचे जबाब व्हिडिओद्वारे घेतले. मात्र त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Male Fertility Decline: तुमच्या जेवणामध्ये असलेल्या 'या' एका घटकाने पुरुषांचा कमी होतो स्पर्म काउंट

Maharashtra Live News Update: खेड पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा

SCROLL FOR NEXT