Boyfriend Beating Girlfriend  Twitter
मुंबई/पुणे

Crime News : बॉयफ्रेंड नव्हे हा तर हैवान! भररस्त्यात प्रेयसीसोबत केलं संतापजनक कृत्य

माहितीनुसार, दोघेही बाहेर फिरायला गेले असताना, तरुणाने या तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला.

Satish Daud

Boyfriend Beating Girlfriend : गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये वाद झाल्याच्या घटना काही नवीन नाही. सोशल मीडियावर प्रियकर आणि प्रेयसीमध्ये झालेल्या वादाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही चीड आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्रियकर त्याच्या प्रेयसीसोबत संतापजक कृत्य करताना दिसून येत आहे. (Latest Marathi News)

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील आहे. या व्हिडीओत (Viral Video)  एक तरुण एका तरुणीला बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. हे दोघेही प्रियकर आणि प्रेयसी असल्याचं सांगितलं जात आहे.

माहितीनुसार, दोघेही बाहेर फिरायला गेले असताना, तरुणाने या तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. यामुळे या तरुणाला राग अनावर झाला. त्याने भररस्त्यात तरुणीला लाथा बुक्क्यांनी (Crime News) बेदम मारहाण केली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की तरुण आणि तरुणी दोघेही रस्त्यावरून जात आहे. त्यानंतर त्यांच्यात काहीतरी गोष्टीवरून वाद सुरू होता. त्यानंतर तरुण हातात असलेलं साहित्य एका बाजूला ठेवून या तरुणीला मारहाण करायला सुरुवात करतो. तो इतक्या जोरात तिला मारहाण करतो की, ती काही वेळानंतर जमिनीवर कोसळते. त्यानंतरही तो तिला मारहाण करीत राहतो.

धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा हा तरुण मारहाण करत होता. तेव्हा तिथं उपस्थित त्याच्या मित्राने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ समोर येताच, सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, या तरुणाला पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे. मात्र, या तरुणीच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT