Paragliding Accident : ४०० फुटांवर गेल्यावर पॅराशूटचा बेल्ट तुटला अन्.., साताऱ्यातील तरुणासोबत घडली भयंकर घटना

पर्यटनासाठी गेलेल्या साताऱ्यातील एका तरुणाचा ४०० फुटांवरून पडून मृत्यू झाला आहे.
Paragliding Accident
Paragliding AccidentSaam TV
Published On

Satara Suraj Shaha Paragliding Accident : पॅराग्लायडिंग हा साहसी खेळ आहे. इथं एक चूक तुमचा जीव घेऊ शकते. याचा प्रत्यय हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यातील लोकांना आला आहे. येथे पर्यटनासाठी गेलेल्या साताऱ्यातील एका तरुणाचा ४०० फुटांवरून पडून मृत्यू झाला आहे. रविवारी (25 डिसेंबर) ही दुर्देवी घटना घडली आहे. सूरज शहा (वय 30) असं मृत तरुणाचं नाव आहे. (Latest Marathi News)

Paragliding Accident
Crime News : बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकाचं क्रूर कृत्य

सूरज हा सातारा (Satara) जिल्ह्यातील शिरवळ गावातील रहिवासी आहे. या घटनेमुळे शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे. सूरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सूरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता.

यावेळी त्याला पॅराग्लायडिंगचा मोह आवरला नाही. डोभी भागातील असलेल्या एका उंच ठिकाणावरून सूरजने चालकासह पॅराग्लायडिंगसाठी झेप घेतली. मात्र, पॅरेशूट ४०० फूटांवर असताना, अचानक बेल्ट तुटला आणि दोघेही खाली कोसळले.

Paragliding Accident
Sunil Gavaskar : भारत-बांगलादेश टेस्ट सामन्यात कॉमेंट्री करत होते गावस्कर, घरून आली अतिशय वाईट बातमी

दरम्यान, सूरजसोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यावेळी सूरज सफरचंदाच्या एका बागेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सूरजसोबत असलेल्या चालकावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर सूरजसोबत असणाऱ्या त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com