Mumbai Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: कांदिवलीत लक्झरी व्होल्वो बसला आग, वेळीच बस रिकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली

मुंबई कांदिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रो मार्गाखालील लक्झरी व्होल्वो बसला आग लागली.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या कांदिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रो मार्गाखालील एका लक्झरी व्होल्वो बसला आग लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. वेळीच बस रिकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे (Luxury Volvo Bus Caught Fire Under The Metro Line In Kandivali Mumbai).

सध्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बसला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे.

जेव्हा या बसला आग (Fire) लागली तेव्हा तिथे मुंबई समता नगर पोलीस आणि वाहतूक विभागाची 3 पथके घटनास्थळी उपस्थित होती. वेळीच बस रिकामी करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. ही बस मालाडहून बोरिवलीच्या दिशेने जात असताना अचानक ही आग लागलीये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळवर पुन्हा प्रशासकराज? बैठकीला दांडी, महायुतीचा नवी रणनीती; एकतर्फी अध्यक्ष निवडून पाटलांचा नवा डाव

चार आमदारांचा एकच मामा! प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर राजन पाटलांची चर्चा; अनगरचे मामा-भाचे राजकारणात

Fact Check: तुमच्या सोन्यात चायनीज पावडरची भेसळ? सोन्याचं वजन वाढवण्यासाठी नवी शक्कल?

2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलं नाही; ठाकरे बंधूंसमोर मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी|VIDEO

आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा टाकल्याने त्वचेला फायदा होतो की नुकसान

SCROLL FOR NEXT