Mumbai : लग्नासाठी ऑनलाईन जीवनसाथी शोधताय? तर सावधान! जाळ्यात कसं ओढलं जातंय वाचा...
Mumbai : लग्नासाठी ऑनलाईन जीवनसाथी शोधताय? तर सावधान! जाळ्यात कसं ओढलं जातंय वाचा... SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai : लग्नासाठी ऑनलाईन जीवनसाथी शोधताय? तर सावधान! जाळ्यात कसं ओढलं जातंय वाचा...

विकास मिरगणे

मुंबई : ऑनलाइन जोडीदाराच्या शोध मोहिमेत सर्वाधिक फसवणूक झाल्याचेच प्रकार घडत आहेत. त्यात काही मुली व त्यांच्या कुटुंबीयांचे बँक खाते (Bank Account) रिकामे करून पळ काढणारे ठग देखील ऑनलाइन (Online) बाशिंग बांधून सज्ज असतात. नवी मुंबईत अशा अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल असून, काही प्रकरणे ही संबंधित कुटुंबांनी बदनामी टाळण्याखातर दडपली आहेत.

मागील काही वर्षांत ऑनलाइनला जोडीदार (Partner) शोध मोहिमेला इतके महत्त्व आले आहे की वधू किंवा वर शोधण्यासाठी देखील वेगवेगळ्या ऑनलाईन (Online) साईटचा (Sites) आधार घेतला जात आहे. मात्र त्या साईटवर संबंधिताने दिलेली माहिती खरीच असते असे नाही. त्यामुळे प्रोफाईलवर (Profile) दिसणारा चेहरा व माहिती खरी समजून लग्राची तयारी चालवलेल्या अनेक मुलींची (Girls) ऐन वेळी फसवणूक झालेली आहे.

हे देखील पहा :

अशी होतेय फसवणूक :

विवाह इच्छुक मुलीने एखाद्या वेबसाईटवर विवाहासाठी (Marriage) नोंदणी केली असल्यास तिच्या अपेक्षांची माहिती मिळवली जाते. त्यानंतर त्याच पद्धतीने बनावट नावाने मुलाची प्रोफाइल बनवून संबंधित मुलीला संपर्क (Contact) साधला जातो. प्रथमदर्शनी घातल्या जाणाऱ्या भुरळला बळी पडून मुलगी मुलाच्या इच्छेप्रमाणे वागू लागते. त्यातूनच मुलीच्या कुटुंबीयांची आर्थिक व मुलीची फसवणूक केली जाते. ज्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल आहे.

अशा बहुतांश प्रकरणांमध्ये संबंधित तरुणीची आर्थिक फसवणूक (Fraud) तर होतेच, मात्र काहींना लैंगिक (Sexual) शोषणाला देखील बळी पडावे लागले आहे. त्यामुळे घरबसल्या जावई शोधण्याचा मोह आवरता घ्यावा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भोवल्यावर चढायला सज्ज असणाऱ्या युवक अथवा युवतीच्या प्रोफाईलची माहिती मिळवून काही ठग त्यांना बनावट प्रोफाईलद्वारे स्वतःकडे आकर्षित करत आहेत. त्यानंतर सदर मुलाला अथवा मुलीला लग्नाचे आमिष दाखवून भेटीगाठी वाढवणे किंवा पैशाची मागणी करणे असे प्रकार घडत आहेत. त्यातून प्रभाव पाडून गाठीभेटी वाढवून अनेकांची आर्थिक लूट केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून उग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

Ratnagiri Sindhudurg: किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल, अखेरच्या काही मिनिटांत मतदानासाठी अवतरले; नारायण राणेंना बसणार फटका?

Maharashtra Politics 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंची 'मोहब्बत की दुकान'; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

SCROLL FOR NEXT