Mugdha Deshmukh Death 
मुंबई/पुणे

लंडनला एमबीए करायला गेलेली तरुणी अचानक गायब; पिंपरीत बंद फ्लॅटमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

Mugdha Deshmukh Death : लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या संभाजीनगरच्या तरुणीचा पिंपरी-चिंचवडमध्ये संशयास्पद मृतदेह आढळला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी

Mugdha Deshmukh Suicide Case : लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील ३४ वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. क्रेडिट कार्ड व्यवहारांमुळे तिचा भारतातील ठावठिकाणा समोर आला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

जुलै २०२५ मध्ये लंडनला गेलेली मुग्धा दररोज घरच्यांशी संपर्कात होती. मात्र, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आईशी शेवटचे बोलणे झाल्यानंतर तिचा संपर्क तुटला. कुटुंबीयांनी लंडन येथील तिच्या मैत्रिणीमार्फत चौकशी केली असता, तिने ऑगस्टच्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भारतीय उच्चायुक्तांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी मुग्धाच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले. त्यात भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगीसारख्या ॲप्सवर तिचे क्रेडिट कार्ड वापरले गेल्याचे उघड झाले.

ती भारतातच असल्याचे निश्चित झाल्यावर पालकांनी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तांत्रिक तपासात तिचे लोकेशन गहुंजे येथील सोसायटीत आढळले. तेथे बनावट चावीच्या साह्याने फ्लॅट उघडला असता तिचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. शिरगाव पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wakad News : पिंपरी चिंचवडमध्ये मायलेकाची आत्महत्या, १८ व्या मजल्यावरून मारली उडी

CBSE चा 10 वीच्या परीक्षेसाठी मोठा निर्णय! गणितात नापास, तरी होणार पास! नेमकं कसं?

10 Gram Gold Mangalsutra: 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र; रोज वापरण्यासाठी सुंदर आणि आकर्षक 5 डिझाइन्स

Devgad Hapus mango : हापूसच्या पहिल्याच पेटीनं केला मार्केट जाम! 36 हजार रुपये विक्रमी दर

Tablet Vs Capsule: टॅब्लेट आणि कॅप्सूलमध्ये नेमका फरक काय आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT