lonavala records hottest day of season at 38 degrees celsius Saam Digital
मुंबई/पुणे

Lonavala Records Hottest Day of Season: लाेणावळ्यात उन्हाचा चटका वाढला; नागरिकांचा रसदार फळे, ताक, सरबताकडे कल

Lonavala Latest Marathi News : पुणे जिल्ह्याप्रमाणेच लोणावळा शहरात देखील उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा व रात्री देखील वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे.

दिलीप कांबळे

Lonavala :

गेल्या काही दिवसांपासून मावळातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात देखील गरमी जाणवू लागली आहे. हवामान खात्याच्या नूसार लाेणावळ्यात 38 अंश तापमानाची नोंद झाली. यंदाचे हे आत्तापर्यंत सर्वाधिक नाेंद झालेले तापमान आहे. उकाड्यापासून शरीराला थंडावा मिळावा यासाठी नागरिकांचा रसदार फळे, ताक, सरबत पिण्याकडे कल वाढू लागला आहे. (Maharashtra News)

गेल्या दोन दिवसांत लोणावळा शहरातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. लोणावळा शहराचे तापमान सरासरी 38 ते 40 अंशा पर्यंत गेले आहे. पुणे जिल्ह्याप्रमाणेच लोणावळा शहरात देखील उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा व रात्री देखील वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे.

वडगांव मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात 41.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सर्वत्र वातावरणात मोठा बदल झाला असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उष्णता वाढली आहे.

पुढील एक आठवडा असेच तापमान राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. महत्वाची कामे सकाळी व संध्याकाळी करावी, दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT