Lonavala - Pune Local Saam TV
मुंबई/पुणे

लोणावळा-पुणे रेल्वेसेवा २०-२५ मिनिटे ठप्प झाली, 'हे' आहे त्यामागचं कारण

सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आधीच रेल्वेचे वेळापत्रकात सतत बदल केले जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे : लोणावळा - पुणे लोकल (Lonavla - Pune Local) खाली म्हैस आल्याने तळेगावजवळ झालेल्या अपघातात एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात (Railway Accident) रेल्वेच्या खाली म्हैस अडकल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातामुळे रेल्वेसेवा जवळपास २० ते २५ मिनिटे ठप्प झाली होती.

सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आधीच रेल्वेचे वेळापत्रकात सतत बदल केले जात आहेत. शिवाय लोणावळा-मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच आज लोणावळा -पुणे या लोकल (Local) खाली एक म्हैस आल्याने रेल्वेचा अपघात झाला. हा अपघात तळेगावजवळ झाल्यामुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे गाड्या काही काळासाठी थांबवण्यात आल्या होत्या. (Heavy rain in Lonavala-Mumbai)

पाहा व्हिडीओ -

या संपुर्ण अपघाताच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र, जनावरांना सुरक्षित अंतरावरती ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या मालकांनी घ्यायला हवी जेणेकरुन त्यांची जनावरे दगावणार नाहीत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरुप बाहेर काढू - मुख्यमंत्री फडणवीस

8th Pay Commission : मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, तारीख समोर

Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत का? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

गोकुळसाठी महायुतीचा ठरला फॉर्म्युला; १ वर्ष भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीला किती वर्षे अध्यक्ष मिळणार?

SCROLL FOR NEXT