Lonavala Bhushi Dam Saam Tv
मुंबई/पुणे

काय ती झाडी, काय ते डोंगार... भुशी डॅम ओव्हरफ्लो होताच पर्यटकांची तुफान गर्दी

आज सकाळी दहा च्या सुमारास भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

दिलीप कांबळे

मावळ : पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा (Lonavala) शहरांमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी डॅम (Bhushi dam) ओव्हरफ्लो झाला आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरण भरण्यास विलंब लागला असला तरी आता धरण भरण्यास सुरुवात झाली आहे.

भुशी धरण (Bhushi dam) हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देत असतात आणि वर्षाविहाराचा आनंद लुटतात. येणार्‍या शनिवार व रविवारी याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे व्यावसाय बंद असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती. यंदा मात्र ही कसूर भरून निघणार आहे.

लोणावळा (Lonavala) पर्यटनस्थळ हे भारतात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात भुशी धरण हे पर्यटकांचे केंद्रबिंदू असते, भूशी डॅमला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. जून महिन्यात पाऊस झाला नाही. मात्र जुलै महिना सुरू होताच पावसाने जोरदार हजेरी लावली असून वर्षा विहारासाठी लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे. आज सकाळी दहा च्या सुमारास भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

भुशी धरण (Bhushi dam) हे महाराष्ट्र राज्यातील जुन्या धरणापैकी एक आहे. हे धरण साधारण इसवी सन १८६० च्या सुमारास बांधले आहे. लोणावळा पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळविण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. पुण्यातून भुशी डॅमला जाणे सोपे पडते, पुण्यातून लोणावळा बस किंवा ट्रेन मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT