BJP Mission Ayodhya Saam Tv
मुंबई/पुणे

BJP Mission Ayodhya: भाजपचं 'मिशन अयोध्या'; मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचं मोफत दर्शन, पहिली ट्रेन आज होणार रवाना

Loksabha Election: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन अयोध्या सुरु केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज पहिली विशेष रेल्वे रवाना होत आहे. भाजप मुंबईकरांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडविणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Special Train CMST To Ayodhya

भाजप मुंबईकरांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडविणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन अयोध्या (Mission Ayodhya) सुरु केलंय. त्याचसाठी आज रात्री 9 वाजता मुंबईतून पहिली विशेष रेल्वे रवाना होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे. (latets political news)

मुंबईकरांना रामलल्लाचं मोफत दर्शन

उत्तर मुंबईतील भाविकांचा पहिला जथ्था आज अयोध्येला कूच करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाविकांना रामलल्लाचं दर्शन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) च्या प्लॅट क्रमांक १८ वरुन ही रेल्वे सुटणार आहे. भाजपचे हे मिशन अयोध्या (BJP Mission Ayodhya) २४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. नवीन अयोध्येत एक टेंट सिटी बनवण्यात आली आहे. यामध्ये २० हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. दररोज विविध राज्यांतील २० हजारांहून अधिक भाविकांना रामलल्लाचं दर्शन दिलं जाणार आहे.

मिशन अयोध्या

राम जन्मभूमीचा मुद्दा नेहमीच राजकारणात सक्रीय राहिला आहे. आता रामलल्ला अयोध्येत मंदिरात विराजमान झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून राम भक्तांसाठी मेगाप्लॅन तयार करण्यात आलाय. राम मंदिराच्या उद्घाटनानंतरही सकारात्मक राजकीय वातावरण कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मिशन अयोध्या तयार करण्यात (Loksabha Election BJP Mission) आलंय.

काय आहे 'मिशन अयोध्या'

मिशन अयोध्यामधून भाविकांना मोफत रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. यासाठी काही खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आला आहे. जवळपास एका लोकसभा मतदारसंघातून 40 ते 50 हजार लोकं रामलल्लाचं दर्शन (Mumbaikars Free Darshan Ram Lalla) घेऊ शकतील, असं नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मुंबईतुन पहिली विशेष रेल्वे या पार्श्वभूमीवर अयोध्येला रवाना होणार आहे.

राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते जानेवारीत पार पडली. त्यानंतर राम भक्तांची अयोध्या वारी सुरु झाली (Special Train CMST To Ayodhya) आहे. अयोध्येत राम भक्तांसाठी निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन अशी व्यवस्था करण्यात आलीय. अनेक दशके राम जन्मभूमीचे आंदोलन चालू होते. अखेर न्यायालयीन लढ्यानंतर तिथे आता भव्य मंदिर साकारण्यात आलंय. त्यामुळं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT