Amit Shah- Raj Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

LokSabha Election 2024 : राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत काय चर्चा झाली? दोन महत्त्वाच्या गोष्टी आल्या समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवेश तांदळे | मुंबई

Mumbai News :

राज ठाकरे यांनी काल भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे आणि भाजपची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र महायुतीत येण्याच्या बदल्यात मनसेला काय मिळणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. महायुतीत लोकसभेची एक किंवा दोन जागा मनसेला सोडल्या जातील अशी चर्चा देखील सुरुर झाली आहे.

सध्या फक्त लोकसभा निवडणुकीविषयी बोलू. विधानसभेबाबत आता काहीच शब्द देणार नाही, असं अमित शाह यांनी राज ठाकरे यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेसोबत २०१९मध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अमित शाह यांनी सावध भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमित शाह-राज ठाकरे यांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास चाळीस मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत मनसेने अमित शाह यांच्याकडे मुंबईतील दोन जागांची मागणी केली. यामध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचा समावेश आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर राहुल नार्वेकर भाजपकडून निवडणूक लढू शकतात.

मात्र त्यांच्याविरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे येथून बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्यासाठी इच्छूक आहे. मात्र मुंबईतून मनसेला दोन देणे कठीण असल्याचं अमित शाह यांनी राज ठाकरे यांना सांगितल्याची माहिती देखील समोर येत आहे.

विधानसभेच्या जागांबाबत शब्द देण्यास नकार

आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांबाबतची राज ठाकरे यांनी अमित शाह यांना विचारला केली. कारण चार पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल. मात्र विधानसभेच्या जागांबाबत आताच काहीही आश्वासन देण्यास अमित शाह यांनी नकार दिला आहे. विधानसभेत सोबत लढू, मात्र जागावाटपाबाबत त्याच वेळी ठरवलं जाईल, असं देखील अमित शाह यांनी म्हटल्याचं कळतंय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चेदरम्यान झालेल्या प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी अमित शाह यांनी ही भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT