लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पीएम मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. पीएम मोदींच्या राज्यात दोन सभा आणि एक रोड शो (PM Modi Roadshow) होणार आहे. घाटकोपर (Ghatkopar) येथे पीएम मोदींचा रोड शो होणार असून या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीएम मोदी मुंबईत येणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन, पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि कल्याणमध्ये पीएम मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर पीएम मोदींचा घाटकोपर येथे संध्याकाळी रोड शो होणार आहे. या रोड शोच्या निमित्ताने घाटकोपरमध्ये (Ghatkopar) पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घाटकोपरमधील रोड शो दरम्यान फुगे, ड्रोन आणि पतंग उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. पीएम मोदींची शिवाजीपार्कवर जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे १७ तारखेपर्यंत ही बंदी लागू असणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. १३ जागांसाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश असणार आहे. यासोबतच कल्याण, ठाणे, भिवंडी, नाशिक, दिंडोरी-धुळे आणि पालघर या मतदारसंघासाठी देखील याच दिवशी मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघातील प्रचाराचा १८ मे हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. अशामध्ये आज मुंबईमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या रोड शोकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीएम मोदींच्या रोडशोला विक्रोळी येथून सुरूवात होणार आहे. या रोड शोसाठी महाराष्ट्र सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोदी ज्या मार्गावरून रोड शो करणार आहेत त्या मार्गावर ठिकठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातील वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.