Nana Patole  SAAM TV
मुंबई/पुणे

Loksabha Election 2024 : काँग्रेस लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार? महाविकास आघाडीतील पक्षांचं टेन्शन वाढलं

Congress Loksabha election : महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील ४८ मतदारसंघातून इच्छूक उमेदवारांची नावे मागितली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (2024 Loksabha Election) जागावाटपावरुन राज्यात सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती.

मात्र महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील ४८ मतदारसंघातून इच्छूक उमेदवारांची नावे मागितली आहे. त्यामुळे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या १० जानेवारीपर्यंत इच्छूकांची नावे काँग्रेसने मागवली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नसल्याने काँग्रेसने ही भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. असं करुन काँग्रेसने महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. मात्र काँग्रेसची ही स्वबळाची तयारी आहे की दबावतंत्र आहे अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसच्या बैठकीत चर्चा

काल म्हणजेच ४ जानेवारी रोजी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुका आणि त्याआधीच काढण्यात येणाऱ्या भारत न्याय यात्रेसाठी पक्षाने केलेल्या तयारीवर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच यावेळी संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाच्या मुद्द्यावरही कालच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात ही चर्चा झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT