Thane lok sabha constituency Saam tv
मुंबई/पुणे

Thane Politics : महायुतीकडून ठाणे लोकसभेच्या उमेदवाराची धुळवडीला घोषणा होणार, कोणाला मिळणार संधी?

Vishal Gangurde

विनय म्हात्रे, ठाणे

Thane lok sabha constituency Politics :

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपने राज्यातील २० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याचे बाकी आहेत. महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार,याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, ठाणे लोकसभा जागेसंदर्भात धुळवाडीला उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती हाती आली आहे. (latest Marathi News)

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात धुळवडीला घोषणा होणार आहे. ठाण्यात टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी खासदार, मंत्रीसह एकनाथ शिंदे धुळवड साजरी करतात. त्याच दिवशी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघासाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापैर नरेश म्हस्के यापैकी एक नाव घोषित होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी तगडा उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून ठाणे लोकसभेत लढत होण्याची शक्यता आहे. धुळवडीला कोणाच्या नावाचा रंग उधळला जाईल, याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत नरेश म्हस्के ?

नरेश म्हस्के हे ठाणे महापालिकेचे माजी महापौर आहेत. म्हस्के हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. नरेश म्हस्के यांची ठाण्यातील आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

कोण आहेत प्रताप सरनाईक?

१९९७ साली हे प्रताप सरनाईक हे ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवळा- माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहे. त्यांनी २००८ साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदेंना साथ दिली.

कोण आहेत रवींद्र फाटक?

रवींद्र फाटक हे शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आहे. फाटक हे २००२ साली पहिल्यांदा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी २०१४ साली ठाण्यात विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT