MNS Padwa Melava: ब्रेकिंग! शिवाजी पार्कवर 'राज गर्जना'; मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024: सर्वात महत्वाची बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv

MNS Padwa Melava News:

सर्वात महत्वाची बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मनसेच्या या पाडवा मेळाव्याला पालिकेने परवानगी दिली असून या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? आगामी लोकसभेच्या संदर्भात मोठी घोषणा करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवतीर्थावर मनसेचा पाडवा मेळावा!

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल रोजी मुंबईच्या दादरयेथील शिवाजी पार्कवर मैदानावर होणार आहे. मनसेच्या या पाडवा मेळाव्याला मुंबई पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवाजी पार्कवर राज गर्जना होणार असल्याने मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे काय बोलणार?

तत्पुर्वी आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मनसे- भाजप युतीच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे शिवतीर्थावरुन राज ठाकरे काय घोषणा करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray
Madha Lok Sabha Constituency : 'माढा'तील राजकराण! रणजितसिंह नाईक निंबाळकर विराेधकांशी महादेव जानकरांची भेट

राज ठाकरेंची शिंदे फडणवीसांसोबत बैठक!

दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वांद्रे येथील ताज लॅण्डसन हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मनसे- भाजप युतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युतीबाबत येत्या दोन- ३ दिवसात निर्णय होईल, असेही सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Raj Thackeray
Maharashtra Lok Sabha Election : ...तरी मी आधीपासूनच हुशार; मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com