Madha Lok Sabha Constituency : 'माढा'तील राजकराण! रणजितसिंह नाईक निंबाळकर विराेधकांशी महादेव जानकरांची भेट

Lok Sabha Election 2024 : महादेव जानकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याचे नेते ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली हाेती.
mahadev jankar meets mohite patil and naik nimbalkar faction in madha lok sabha constituency
mahadev jankar meets mohite patil and naik nimbalkar faction in madha lok sabha constituency saam tv

- ओंकार कदम / भारत नागणे

Mahadev Jankar Latest Marathi News :

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (mahadev jankar) यांनी आज (बुधवार) महायुतीमधील (mahayuti) नाराज असलेले अकूलजमधील भाजपचे ज्येष्ठ नेेते विजयसिंह माेहिते पाटील (vijaysinh mohite patil) आणि फलटणमधील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर (sanjeevraje naik nimbalkar) यांची भेट घेतली. जानकर हे माढा लाेकसभा मतदारसंघात (madha lok sabha election 2024) इच्छुक असल्याने त्यांनी महायुतीमधील नाराज असलेल्या दाेन्ही नेत्यांच्या भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (mp ranjitsinh naik nimbalkar) यांना उमेदवारी दिल्याने महायुतीमधील रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar latest marathi news) आणि माहिते पाटील गट नाराज आहे. महायुतीतच रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोध होत असतानाच आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी फलटण येथे लोकसभा निवडणूकीसाठी इच्छुक असलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (sanjeevraje naik nimbalkar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

mahadev jankar meets mohite patil and naik nimbalkar faction in madha lok sabha constituency
BJP Candidate : सातारा लाेकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रसेचा; उदयनराजे, शिवेंद्रराजे भूमिकेवर ठाम, आज निर्णयाक बैठक

या भेटीबाबत जानकर म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांचा आशीर्वाद मला कायम असतो. त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे देखील नेहमीच सहकार्य लाभल्याचे जानकरांनी नमूद केले.

महादेव जानकर माेहिते पाटील भेट

रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर महादेव जानकर यांची गाडी थेट अकलूजमध्ये पाेहचली. तेथे त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. जानकर आणि माेहिते पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाविकास आघाडीकडून महादेव जानकर हे इच्छुक असतानाच धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांनी याच मतदारसंघात गावभेट दौरे व गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

mahadev jankar meets mohite patil and naik nimbalkar faction in madha lok sabha constituency
Sharad Pawar: पुणे, माढा, सातारा काेणत्या लाेकसभा मतदारसंघातून शरद पवार लढणार? कार्यकर्त्यांना पवारांनी स्पष्टच सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com