- सुशील थोरात
लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके (mla nilesh lanke) यांची पत्नी राणी यांनी शिवस्वराज्य यात्रेस प्रारंभ केला आहे. राणी लंके (rani lanke) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार (ahmednagar lok sabha constituency) केल्याने कार्यकर्त्यांमध्ये माेठा उत्साह दिसून येत आहे. (Maharashtra News)
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण व आपले पती आमदार नीलेश लंके इच्छुक आहोत. समोर कोण आहे, याचा विचार आम्ही करीत नाही. कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच आहोत असा ठाम निर्धार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी नीलेश लंके यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले.
पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात सामील झालेत. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पुढील सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याची घोषणा केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या नगर दक्षिण जिल्ह्याचे विद्यमान खासदार भाजपचे सुजय विखे- पाटील (mp sujay vikhe patil) आहेत. राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यामुळे अहमदनगरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. लंके यांच्या घाेषणेमुळे विखे-पाटील गटात देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
शिवस्वराज्य यात्रा
राणी लंके यांनी मोहटादेवीचे दर्शन घेत शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला. लोकसभा निवडणुकीचाच एक भाग म्हणून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.