Covid-19: घाबरू नका, काळजी घ्या; छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय, ‘जेएन-१’ ची एन्ट्री

महापालिकेच्या 41 आरोग्य केंद्र आणि 8 आरोग्यवर्धिनी केंद्रावर रुग्ण तपासणी करण्यात येत आहे.
53 patients tested covid 19 positive in chhatrapati sambhajinagar
53 patients tested covid 19 positive in chhatrapati sambhajinagarSAAM TV
Published On

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhajinagar :

छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाच्या नव्या जेएन 1 विषाणूचा (Covid-19 JN.1 Variant) संसर्ग अधिक वाढू नये याकरिता महापालिकेकडून चाचण्यांच्या तपासणीवर भर दिला जात आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात दोन रुग्ण जेएन 1 विषाणूचे बाधित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.  (Maharashtra News)

देशात पुन्हा एकदा काेविड-19 चा संसर्ग वाढू लागला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील काेविड-19 चे रुग्ण आढळू लागले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात प्रशासनाने सर्दी, खाेकला या सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना काेविड-19 ची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. या तपासणीनंतर काेविड-19 बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

53 patients tested covid 19 positive in chhatrapati sambhajinagar
Girni Kamgar Melava: गिरणी कामगारांसाठी शिवेंद्रराजेंचा ॲक्शनप्लान, ठाकरेंकडून फसगत : आमदार सुनील राणे

छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेकडून काेविड-19 च्या चाचण्यांच्या तपासणीवर भर दिला आहे. मागील तीन आठवड्यात १७३१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 53 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापैकी दोन रुग्ण हे जेएन 1 विषाणूचे बाधित असल्याची माहिती महापालिकेने दिली. महापालिकेच्या 41 आरोग्य केंद्र आणि 8 आरोग्यवर्धिनी केंद्रावर रुग्ण तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 46 हाेती. त्यात वाढ झाली असून बाधिताची संख्या 53 वर पोहचली आहे.

Edited By : Siddharth Latkar

53 patients tested covid 19 positive in chhatrapati sambhajinagar
Savitribai Phule Jayanti: नायगावात सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकास शरद पवार गटाकडून दुग्धाभिषेक, भुजबळ, चाकणकरांना दर्शविला विराेध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com