पुण्यात लॉकडाऊन? निर्बंधाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचे सूचक विधान Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात लॉकडाऊन? निर्बंधाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचे सूचक विधान

नुकतीच पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) कोरोना संबंधी आढावा बैठक पार पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे: पुण्यात कोरोनाचा (Corona) मोठा विस्फोट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. नुकतीच पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) कोरोना संबंधी आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सूचक विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातल्या निर्बंधाविषयी भाष्य केले आहे.

महापौरांनी माहिती दिली की, निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच क्वॉरंटाईनसाठी पुन्हा हॉटेल सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितल आहे. याव्यतिरिक्त पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचणे महत्त्वाचे आहे त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहे असं महापौर म्हणाले आहेत.

हे देखील पहा-

पुण्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं कोरोनाबाधित

दोन्ही डोस घेतलेले ८० टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसून आले आहे. २७ डिसेंबर ते १ जानेवारी या दरम्यान पाच ते सहा दिवसांमध्ये पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जात आहे. 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत आहेत अस महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितले आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT