पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांनी लढा देऊन जिंकलेले किल्ले पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात. परंतु मराठी भाषा किंवा भारतातली इतर भाषा येत नसलेल्या पर्यटकांना आपल्या महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करयाला सांगत असल्याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचं काम काही माथेफिरू तरुण करत आहेत.
असाच काहीसा प्रकार कॅनडातून आलेल्या पर्यटकासोबत घडला आहे. कॅनडा देशातून आलेल्या पर्यटक सिंहगड किल्ला सर करत असताना त्याला काही महाराष्ट्रातील तरुण भेटले. याप्रसंगी आपण कुठून आले आहेत? कसे आले आहेत? हा मूळ परिचय सोडून त्या तरुणांनी त्यांच्या मित्राला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी शिवीगाळही केलं. मात्र, शिवीगाळ करत असताना आपण काहीतरी चुकीचं बोलत आहे, असं त्या पर्यटकाला वाटलं. कारण पर्यटक बोलल्यानंतर तरुण हसू लागले.
अतिथी देव भव! आपली ही महाराष्ट्राची संस्कृती सांगते. पण आपल्या तरुणांनी त्यांना महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी शिवीगाळ करण्यास भाग पाडलं. अशी खंत त्या पर्यटकाच्या मनात उद्भवली. त्यामुळे 'आम्ही येथे पुन्हा येणार नाही', असा त्या पर्यटकाने त्याच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे. महाराजांचे किल्ले सर करण्यासाठी इतर देशातून येणाऱ्या पर्यटकांना हीन दर्जाची वागणूक काही तरुण देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती याला डाग लागला असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडिओ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर कारवाई होईल का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.