Shravan Puja on railway tracks  Saam tv
मुंबई/पुणे

Shravan Puja on railway tracks : रेल्वे रुळावर मरीआईचं ठाण? भक्तांकडून जीव धोक्यात घालून पूजा, कोंबड्यांचाही दिला जातो बळी

Shravan Puja on railway tracks : चेंबूर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर मरीआईचं ठाणे असल्याची श्रद्धा आहे. यामुळे स्थानिकांची जीव धोक्यात घालून पूजा सुरु असते. या ठिकाणी भक्तांकडूनही कोंबड्यांचाही बळी दिला जातो.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या चेंबूरमध्ये भाविक रेल्वे स्थानक लगत असलेल्या रेल्वे रुळावर पूजा सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. चेंबूरमधील या रुळावर मरीआई, यल्लमा, लक्ष्मी देवी अशा विविध नावाच्या देवीचे ठाणे असल्याची या भक्तांची धारणा आहे. आषाढी एकादशीपासून येणाऱ्या अमावास्यापर्यंत दर मंगळवार आणि शुक्रवारीही पूजा होते. आज आणि अमावस्येला इथे या रेल्वे रुळावर बळी देण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

रुळावरील पूजेमुळे लोहमार्ग पोलीस, आरपीएफचे जवान तात्पुरते तैनात करण्यात आले आहेत. ते पूर्णवेळ इथे थांबत नाहीत. या ठिकाणी या रेल्वे रुळातच ही देवी असून तिला कोंबड्या बकऱ्यांचा बळीही दिला जात असल्याचेही समोर आलं आहे. रुळावरील देवी कुठेही गेलेली नाही. म्हणून तिची पूजा केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हा रेल्वे रूळ प्रचंड रहदारीचा आहे. भाविकांची ही श्रद्धा जरी असली तरी इथे मोठा अपघात ही घडू शकतो. लोहमार्ग पोलिसांनी मागील पूजेचे साहित्य जरी इथून हटविले तरी ही पूजा परंपरेने सुरुच राहणार असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

स्थानिकांचं म्हणणं काय?

चेंबूरमधील रेल्वे रुळावर मरीआईची पूजा केली जाते. या रुळावर पूजा करण्यासाठी कुर्ला, चेंबूर या भागातून लोक पूजा करायला येतात. या ठिकाणी आधी देवीचं मंदिर असल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वे पोलीस, जीआरपी पोलीस या ठिकाणी तैनात असतात.

' मागील ७०-८० वर्षांपासून पूजा सूरु आहे. रेल्वे रुळाच्या आधी या ठिकाणी मंदिर होतं. तेव्हापासून पूजा होत आहे. रेल्वे रुळामुळे मंदिर जमिनदोस्त करण्यात आलं. त्यानंतर पुढे भाविकांनी रेल्वे रुळाजवळ देवीच्या पादूका तिथे ठेवल्या. रेल्वे रुळाजवळ मरीआईचं मंदिर आहे, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात काही भागात पावसाची हजेरी

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक

Vijaykumar Gavit: डॉ. विजयकुमार गावित सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री; शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप|VIDEO

Salman Khan Shera : सलमान खानच्या बॉडीगार्डवर दु:खाचा डोंगर, शेराच्या वडिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू

Government Scheme: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सरकारची 'ही' जबरदस्त योजना, खात्यात जमा होणार ३६००० रुपये

SCROLL FOR NEXT