Independence Day 2023 LIVE  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political Live Update: काळू धबधब्यात पाय घसरून 1 जण बेपत्ता, 24 तासांनंतरही तरुणाचा ठावठिकाणा नाही

August 15 Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे.

साम टिव्ही ब्युरो

काळू धबधब्यात पाय घसरून 1 जण बेपत्ता, 24 तासांनंतरही तरुणाचा ठावठिकाणा नाही

काळू धबधबा पर्यंटकांसाठी बंद करण्यात आला आहे. माळशेज काळू धबधब्याजवळ पाय घसरून 1 जण बेपत्ता झाला आहे. ठाणे हद्दीतील ही घटना आहे. हैद्राबादच्या उटी येथील 4 तरुण आले होते, काळू धबधबा परिसरात फिरायला आले होते. रेस्क्यू टीमची शोधमोहीम अजूनही सुरू आहे. 24 तासांनंतरही तरुणाचा ठावठिकाणा नाही.

भुजबळानंतर शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे ? अजित पवार गटाचा दुसरा नेता लक्ष

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बीड येथील सभेची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मराठवाड्यातील पहिलीच सभा बीडमध्ये होणारं असल्यानं भुजबळांनतर अजित दादा गटाचे दुसरे मंत्री धनंजय मुंडे शरद पवारांच्या टार्गेटवर तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.

पंतप्रधान मोदींनी केली विश्वकर्मा योजनेची घोषणा

येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह देशाला नवीन बळ देण्यासाठी आम्ही विश्वकर्मा योजना सुरू करणार आहोत. पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांसाठी 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह सरकार पुढील महिन्यात विश्वकर्मा योजना सुरू करणार आहे.

मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहीन-PM मोदी

मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहीन. राजकीय कुटुंबवादातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. विरोधी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदींनी म्हटलं की, देशाच्या विकासासाठी परिवारवादातून मुक्ती गरजेचं आहे.

देशाला G-20 शिखर परिषद आयोजित करण्याची संधी मिळाली

आमचा जनतेवर विश्वास आहे, जनतेचा सरकार आणि देशावर विश्वास आहे. आज देशाला G-20 शिखर परिषद आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. G-20 चे अनेक कार्यक्रम भारताच्या कानाकोपऱ्यात झाले आहेत. देशाच्या विविधतेची ओळख त्यांनी जगाला करून दिली.

भारत आता थांबणार नाही- मोदी

भारत आता थांबणार नाही. जग भारताचं कौतुक करत आहे. कोरोनानंतर नव्या बदलांसह जग पुढे जात आहे. बदलत्या जगाला आकार देण्यात भारताचं सामर्थ्य दिसत आहे. कोरोना काळात भारताचं सामर्थ्य जगाने पाहिलं आहे.

देश तंत्रज्ञान क्षेत्रातही पुढे - PM मोदी

येणारा काळ तंत्रज्ञानाचा असेल. भारत तंत्रज्ञानातही अग्रेसर आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व वीरांना श्रद्धांजली- PM मोदी

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या काळातील निर्णय हजार वर्षांचा सुवर्ण इतिहास लिहले जातील.

पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरुन मणिपूरवर भाष्य

देश मणिपूरमधील नागरिकांच्या सोबत आहे. सध्या तिथे शांती प्रस्थापित होत आहे. मणिपूरमधील नागरिकांनी शांतता राखावी.

देशातील १४० कोटी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा : PM नरेंद्र मोदी

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात लाल किल्ल्यावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

देशातील सर्व नागरिकांच्या एकजुटीतून स्वातंत्र्य आणि लोकशाही भक्कम करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मजबूत करण्याचा स्वातंत्र्यदिनी दृढनिर्धार करुया.

Independence Day 2023 LIVE

Independence Day 2023 LIVE: देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्यावरून दहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT