Dry Day  Saam Tv
मुंबई/पुणे

Dry Day On 24, 25, 26 June: ब्रेकिंग! विधान परिषद निवडणुकांमुळे ३ दिवस ड्राय डे; हॉटेल अन् बार मालक आक्रमक, कोर्टात घेणार धाव

Dry Day On 24th June to 26th June Due To Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकांमुळे ३ दिवस ड्राय डे असणार आहे. त्यामुळे वातावरण तापलेलं दिसत आहे. हॉटेल अन् बार मालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Rohini Gudaghe

राज्यात २६ जून रोजी विधान परिषद निवडणूका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषद निवडणुकांमुळे ३ दिवस ड्राय डे असणार आहे. २४ जून ते २६ जून दरम्यान ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. आता या तीन दिवसांच्या ड्राय डे मुळे हॉटेल आणि बार मालकांचे लाखोचे नुकसान होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आता या ड्राय डेविरोधात हॉटेल अन् बार मालक आक्रमक झाले आहेत, ते कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वा देखील लोकसभा निवडणुकीमुळे तीन दिवस ड्राय डे पाळण्यात आला (Vidhan Parishad Election) होता. आता एकदा कोकण, नाशिक आणि मुंबईमध्ये विधानपरिषद निवडणूका होत आहेत. त्यामुळे ड्राय डेचा निर्णय घेण्यात आलाय. परंतु तीन दिवसांऐवजी एका दिवसासाठी ड्राय डेचा विचार करावा, अशी मागणी बार मालक करत आहेत.

'ड्राय डे'मुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान

आता हॉटेल मालक आणि बार मालक यांच्या मागणीला काय प्रतिसाद मिळतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबई आणि राज्यात इतर ठिकाणी हजारो दारूची दुकाने (Dry Day) आहेत. तीन दिवसांच्या 'ड्राय डे'मुळे हजारो कोटी रुपयांच्या व्यवसायाचे नुकसान होईल, याशिवाय लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होईल, असं बार मालक म्हणत (Liquior Shop Close) आहेत.

चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये निवडणूक

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत ( Vidhan Parishad News) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार पुन्हा आमने सामने आहेत. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये निवडणूका होणार आहेत. येत्या २६ जून रोजी निवडणूका होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT