Ghod River saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ambegaon: वीजवाहिनीचं काम करताना अनर्थ घडला; पाय घसरून कामगार नदीत बुडाला, शोध सुरू

Ghod River: आंबेगाव तालुक्यातील कवठे यमाई येथे वीज वाहिनीचं काम करणारा कामगार पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Ambegaon:

आंबेगाव तालुक्यातील कवठे यमाई येथे वीज वाहिनीचं काम करणारा कामगार पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. राजेंद्र विक्रम कोळी, असे पाण्यात बुडालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडलीय.

कवठे यमाई येथील घोडनदीच्या खार ओढ्यालगत विद्युत लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू होतं. यादरम्यान राजेंद्र हा ओढ्या जवळून जात असताना पाय घसरला आणि तो पाण्यात पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रेस्क्यू टीमकडून पाण्यात त्याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलीस पथक, बचावकार्य दाखल झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार ओढ्यात वाहून गेलेल्या कामगार राजेंद्र हा वीज वाहिनीचे तार ओढण्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराकडे काम होता. त्याचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील मालखेडा आहे.

दरम्यान ही घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली तो अद्याप सापडला नाहीये. कवठे यमाई गावाला लागून असलेल्या घोडनदी किनारी लाईन ओढण्याचे काम चालू होते. त्यावेली राजेंद्रचा पाय घसरला त्यामुळे त्याचा तोल गेला आणि नदीत वाहून गेला. लाईनमॅन नदीत पडल्याचं स्थानिकांना समजाताच स्थानिक नागरिक आणि स्थानिक मच्छीमार यांच्याकडून शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Pune-Solapur : पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

Acidity in women: ॲसिडीटी, अपचन समजून ५०% लोकं करतायत 'या' गंभीर समस्येकडे दुर्लक्ष; सर्वाधिक महिला आणि मधुमेहींचा समावेश

Jawhar Heavy Rain : अतिवृष्टीने रस्ता खचला; ५० फुटाच्या लांब भेगा, रहदारी पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT