salman khan threat because of hunting Blackbuck Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : सलमान खानला ते धमकीचं पत्रं का आलं? काळवीट प्रकरणाशी काय आहे संबंध? पाहा...

Salman Khan Threat Letter : 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ साली सलमाननं राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती.

सूरज सावंत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडिल सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे (Threat Letter) मिळाली होती. या पत्रात, "सलीम खान, सलमान खान खूपच लवकर तुमचा मुसेवाला (Moosewala) होणार आहे" अशा शब्दातं धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानला धमकी मिळाली, त्याचं कारण म्हणजे काळवीट शिकार प्रकरण! सलमान खानला काळवीट (Blackbuck) शिकार प्रकरणीच धमकी मिळाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत कायदा आणि सुव्यस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. (Letters of threat to Salman Khan for hunting Blackbuck by bishnoi gang; Preliminary estimates of the police)

हे देखील पाहा -

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि त्याच्या वडिलांना बिश्र्नोई गँगकडूनच धमकी मिळाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सलमानचे वडिल सलीम खान बँडस्टँड परिसरतील ज्या बाकड्यावर बसतात त्याचं ठिकाणी त्यांनी धमकीची चिठ्ठी मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली. रेकी करुन अशा प्रकारची चिठ्ठी ठेवण्यात आल्याचा पोलीसांचा दावा असल्याचं सुत्रांनी सांगितलं. याबाबत पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही पडताळणी सुरू असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा बिष्षोई समाजाचा आहे. या समाजात काळ्या हरणांना पवित्र मानले जाते त्यामुळे काळ्या हरणाची शिकार केल्याचा राग लॉरेन्स बिष्णोईच्या मनात आहे. म्हणूनच सलमानला ही धमकी दिल्याचं बोललं जात आहे.

काय आहे काळवीट प्रकरण?

'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ साली सलमाननं राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानं त्याला सहा दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागलं होतं. मात्र, त्यानंतर हायकोर्टानं त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. राजस्थानात १९९८ मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटींदरम्यान काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरविण्यात आलं होतं.

५ एप्रिल २०१८ रोजी ट्रायल कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला दोषी ठरवले होते आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर या प्रकरणातील सहआरोपी चित्रपट अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती आणि सलमान खानला अटक करून जोधपूर तुरुंगात रवानगी करण्यात आले. तीन दिवसांनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान सलमानने त्याला सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. तर आर्म्स ऍक्ट प्रकरणी न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला राज्य सरकारने न्यायालयात आव्हान दिले आहे. काळवीट शिकार प्रकरणाला आता जवळपास २४ वर्षे झाली आहेत. पण,तरीही सलमाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 MLA: सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले टॉप १० आमदार कोण?

IPL Mega Auction 2025 Live News: मुंबईकर रिकाम्या हातीच परतले! रहाणे, शार्दुल अन् पृथ्वी शॉ अन्सोल्ड

Dheeraj Deshmukh News : .. अन् धीरज देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना झाले अश्रु अनावर|VIDEO

Maharashtra News Live Updates: सुरेश धस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा; आष्टी तालुका बंदचा दिला इशारा

चणा डाळीचे crispy कबाब कधी खाल्लेत का?

SCROLL FOR NEXT