दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट; पाहा ताजी आकडेवारी

आतापर्यंत 5,24,708 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
corona in India Omicron subvariant, Corona Virus Latest Marathi News, Covid News
corona in India Omicron subvariant, Corona Virus Latest Marathi News, Covid NewsSAAM TV
Published On

नवी दिल्ली : कोरोनाची (Corona) तिसरी लाट ओसरल्यानंतर देशात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अशातच आरोग्य मंत्रालयाने देशात गेल्या 24 तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. (Corona Virus Latest Update in India)

corona in India Omicron subvariant, Corona Virus Latest Marathi News, Covid News
Norovirus : कोरोनानंतर आता नोरोव्हायरचं संकट; केरळात २ मुलांना संसर्ग, ही आहेत लक्षणे

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 हजार 714 रुग्ण आढळून आले आहेत. तर यादरम्यान 7 जणांचा मृत्युही झाला आहे. त्यामुळे देशात सक्रिय कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26,976 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 5,24,708 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

अहवालानुसार, 24 तासांत तब्बल 2,513 रुग्णही कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,26,33,365 वर पोहचली आहे. दरम्यान, रविवारी (5 मे) देशात कोरोनाचे 4 हजार 518 नवीन रुग्ण आढळून आले होते. रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी रुग्णसंख्या आढळून आली आहे.

यापूर्वी 5 जून रोजी कोरोनाचे 4 हजार 518 रुग्ण, 05 जून रोजी 4 हजार 270 रुग्ण, 04 जून रोजी 3 हजार 962 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 4 जून रोजी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक 26 लोकांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार, देशातील एकूण सक्रिय प्रकरणांचा दर आता 0.06 टक्के आहे, तर कोरोनापासून बरे होण्याचा दर 98.8 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com