Nana Patole Saam Tv
मुंबई/पुणे

केंद्राचं सरकार काँग्रेसला चालवायला द्या, महागाईवरुन नाना पटोलेंचा टोला

2014 ला मोदी पंतप्रधान झाले. महागाई कमी करण्याचे रोजगाराचे आश्वासन देऊन त्यांनी लोकांना विश्वासात घेवून सत्ता स्थापन केली.

सुमित सावंत

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देशातील महागाईवरती टीका केली आहे. 2014 ला मोदी पंतप्रधान झाले. महागाई कमी करण्याचे रोजगाराचे आश्वासन देऊन त्यांनी लोकांना विश्वासात घेवून सत्ता स्थापन केली. देशाच्या सत्तेत बसल्यापासून तेव्हापासून एका गोष्टीची किंमत, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या नाहीत तर त्या वाढत गेल्या, देश सतत मागे पडत चाललाय आपला देश 2014 मध्ये फ्रिडम मीडियामध्ये चौथ्या क्रमांकावर होता, आता आपण दिडशेव्या क्रमांकावर गेलो. महागाईचं नातं बीजेपी (BJP) सोबत जोडलं गेलंय अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

देशातील लोकांना आर्थिक कमजोर करणे, बेरोजगार करणे हा भाजपचा मूळ उद्देश आहे. महागाईचा इंडेक्स चार टक्क्यांवर गेला तर लोक जगू शकत नाहीत, महागाईचा इंडेक्स ९ टक्क्यावर वर गेला आहे. दरडोई उत्पन्नाच्या आधारावर महागाईचा इंडेक्स ठरवला जातो पण भाजप केंद्र सरकार तो इंडेक्स पार करून आमच्या हातात काहीच नाही असं म्हणत असेल तर केंद्राचं सरकार काँग्रेसला चालवायला द्या. देशाची पत सांभाळून ठेवण्याचे काम फक्त काँग्रेसच करू शकते असे नाना पटोले म्हणाले आहेत.

भाजपचं खोटं बोल पण रेटून हा व्यवसाय आहे ही त्यांची मानसिकता आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर टॅक्स अजिबात राज्यात वाढलेला नाही फडणवीसांच्या काळातले वाढलेले आहेत. आम्ही जर वाढवले असते तर त्यांना बोलण्याचा अधिकार होता. केंद्र सरकारकडे जीएसटीचे आणि राज्य विकासाचे एक लाख कोटी रुपयांच्या वर पैसे आहेत ते केंद्राने द्यावेत.

राज्याच्या विकासाची काळजी यांना आहे, एमपीएससीची नोकर भरती यांनी केली नाही आता ती सुरू झाली आहे. राज्याला कंगाल करण्याची भूमिका भाजपची असेल तर तो वेगळा भाग असेल. काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य सरकारने व्हॅटमध्ये काही कमी करता येईल का यावर पत्र दिले आहे असे नाना पटोले म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Scam : म्हाडामध्ये मोठा घोटाळा; मास्टरलिस्टमध्ये आढळली १५ बनावट नावे, गाळे बळकावले

Maharashtra Live News Update: जालना रोडवर चारचाकीचा भीषण अपघात

Uttarkashi Cloud burst: ढगफुटीचा कहर! उत्तराखंडमध्ये गावात पूराचा हाहाकार, अनेक घरे जमीनदोस्त|VIDEO

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये वारंवार का होतेय ढगफुटी? उत्तरकाशीमधील व्हिडिओ धडकी भरवणारा

Mumbai-Pune Tourism : वीकेंडला दूर नको; मुंबई-पुण्याजवळच प्लान करा ट्रिप, ५ स्वस्तात मस्त ठिकाणं

SCROLL FOR NEXT