कल्याणच्या रोहण-वाहोली परिसरात बिबट्याचा संचार
बिबट्याने परिसरातील कुत्र्यांवर वारंवार हल्ले केले
वनविभाग आणि प्राणीमित्र पथकाने शोधमोहीम सुरू केली
नागरिकांना सतर्क राहण्याचे व सुरक्षिततेच्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे
संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी
कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामीण भागांनंतर आता कल्याण सारख्या गजबजलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागत बिबट्याची दहशत असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण भागातील रोहण - वाहोली परिसरात बिबट्याचा संचार सुरु असून या बिबट्यामुळे परिसरातील कुत्र्यांवर वारंवार हल्ले होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील रोहण - वाहोली परिसरात बिबट्याचा संचार सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून रोहण- वाहोली गाव परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून, त्याने परिसरातील अनेक वेळा कुत्रे आणि जनावरांवर हल्ला केला आहे
या घटनेनंतर वनविभाग आणि प्राणीमित्र पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, तज्ञ अधिकारी आणि स्थानिक ग्रामसुरक्षा समिती एकत्रितपणे हालचालीवर लक्ष ठेवत आहेत. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने काही सूचना दिल्या असून, एकटे बाहेर न पडणे, लहान मुलांना एकटे न ठेवणे, हातात काठी ठेवणे आणि मोबाईलवर गाणी वाजवत हालचाल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण रोहण-वाहोली परिसरात वनविभाग आणि ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यभरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत तर काही जण मृत्युमुखी पडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.