Legislative Council Elections Live Blog On Saam Digital Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Legislative Council Elections Live : दहाव्या जागेसाठी प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात जोरदार चुरस

Latest Updates on Maharashtra Legislative Council Elections Live Updates : विधान परिषदेच्या १० जागेसाठी आज सोमवारी (२० जून) ला मतदान सुरू झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि भाजप या दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दहाव्या जागेसाठी प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात चुरस

विधानपरिषदेची मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी. तर भाजपचे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे विजयी झाले आहेत. तर दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या जोरदार चुरस सुरू आहे.

विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे राम शिंदे विजयी झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. 

रामराजेनंतर भाजपच्या खापरेंच्या मतावरही आक्षेप

मत मोजणीच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकर यांचे एका मतावर आक्षेप घेतला होता. आता भाजपच्या उमा खापरे आणि राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचे मत बाद ठरवण्यात आलं आहे. हे दोन्ही मत बाजूला ठेवून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या बाद झालेल्या मतानंतर मतांचा कोटा आता कमी झाला आहे.

मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया थांबली आहे. काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी कळवलं आहे. कॉंग्रेसने भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली असा आरोप काँग्रेसने भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला होता.

मोठी बातमी! काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली असा आरोप काँग्रेसने भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. गुप्त मतदान असताना दुसऱ्यांची मदत घेतल्याने ही हरकत घेतली आहे.

देशमुख-मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; दोघांनाही मतदानाचा हक्क नाकारला

महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेत मतदानाची परवानगी कोर्टाने नाकारली आहे.

राष्ट्रवादीची पहिली पसंत राष्ट्रवादीच! आपल्याच उमेदवाराला दिलं मत

राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं आपल्याच उमेदवाराला दिली आहेत. तर तिसऱ्या पसंतीची मतं भाई जगताप आणि चौथ्या पसंतीची मतं चंद्रकांत हांडोरे यांना देण्यात आली आहेत.

महाविकास आघाडीची अंतिम क्षणी खेळी

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने गुप्तता पाळत आपल्या उमेदवारांचा कोटा अंतिम क्षणी ठरवला. काँग्रेस ने आपल्या दोन उमेदवारांसाठी 29 चा कोटा केला, राष्ट्रवादीने 30 तर सेनेने सर्वाधिक 31चा कोटा ठेवला आहे. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांनी हा उमेदवार निवडीसाठी कोटा ठरवला. विधान परिषदेत सहाही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही रणनीती महाविकास आघाडीने अंतिम क्षणी केली आहे.

काँग्रेसचे मतदान पूर्ण; पटोलेंनी दिलं शेवटचं मत

विधान परिषद निवडणुकीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले. यात काँग्रेसच्या सर्व आमदारांनी मतदान पूर्ण केलं आहे. सर्वात शेवटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदान केलं आहे.

भविष्यात प्रहारचाही मुख्यमंत्री होऊ शकतो : बच्चू कडू

येणाऱ्या काळात अपक्ष आणि लहान पक्षांचे महत्व वाढेल आणि तेच ठरवतील मुख्यमंत्री कुणाला बसवायचं, भविष्यात प्रहारचाही मुख्यमंत्री होऊ शकतो असा विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

आमदार दिलीप मोहिते पुन्हा नाराज!

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite Patil) नाराज असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Council Elections) मतदान करण्याबाबत अद्यापही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांना भेटूनच आपण मतदानाबाबत ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Dilip Mohite Latest Marathi News)

दुपारी १२ वाजेपर्यंत २०३ आमदारांनी केले मतदान

विधान परिषद निवडणुकीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे.

रवी राणांवर पाेलीसांची करडी नजर; वारंट रद्दसाठी न्यायालयात धाव

अमरावतीचे आमदार रवी राणांविरोधात जामीनपात्र वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस त्यांच्या मुंबईतील घरी पोहोचले. मात्र, रवी राणा हे घरी नसल्याने त्यांना पोलीस अटक करु शकले नाहीत. भाजपला मतदान करु नये या उद्देशाने हा महाविकास आघाडीचा दबाव आहे, याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे, असं उत्तर यावर रवी राणा यांनी दिलं आहे.

कॉंग्रेसच्या ३५ आमदारांचं मतदान

कॉंग्रेसच्या ३५ आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केले आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप मतदानावर ठाम

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मतदानाला येऊ नका असे सांगितले आहे. मात्र तरीही लक्ष्मण जगताप मतदानाला येण्यावर ठाम आहेत. लक्ष्मण जगताप दुपारपर्यंत मतदानाला पोहोचतील अशी माहिती मिळत आहे.लक्ष्मण जगताप यांना देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी फोन करून तब्येतीची विचारपूस केली आहे.

शिवसेना आमदारांचे मतदान सुरू ; घेतली जातेय विशेष काळजी

शिवसेना आमदारांचे मतदान सुरू झाले आहे. यासाठी शिवसेनेकडून विशेष काळजी घेतली जातेय. एक विधान परिषद आमदारासोबत एक विधानसभा सदस्य जात आहे. विधान परिषद आमदार मतदान सुरू असलेल्या हॉलपर्यंत विधानसभा आमदारासोबत जात आहे.

मतदानाच्या हक्कासाठी देशमुख, मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषद निवडणूकीत मतदान करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. मतदानासाठी तात्पुरती सुटका करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दोघांना नकार दिला होता. या निर्णयाला देशमुख आणि मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं आहे.

आमदार लक्ष्मण जगताप मुंबईकडे रवाना

मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त असणारे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मुक्ता टिळक मुंबईकडे रवाना

मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त असणाऱ्या पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी पुण्याहून (Pune) मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. शिवाय पक्षाला आपली गरज असून, पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात असल्यामुळे आपण मतदानासाठी जात असल्याचे मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी सांगितलं आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पोलिंग एजंट

काँग्रेस - अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमर राजूरकर.

राष्ट्रवादी काँग्रेस - प्राजक्त तनपुरे, अनिल पाटील, संजय बनसोडे.

भाजप - संजय कुटे, अतुल भातखळकर, रणधीर सावरकर, आशिष शेलार, राहुल नार्वेकर.

शिवसेना - विलास पोतनीस, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू.

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सतर्क; आमदारांशी साधणार संवाद

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सतर्क झाले आहेत. विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री आमदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना पाच आमदारांचे गट तयार करणार आणि मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलणार. मग हे आमदार मतदान करणार आहेत. शिवसेननेच्या आमदारांचं मतदान अद्याप सुरू झालेलं नाही.

पहिल्या तासात ६५ आमदारांचे मतदान

मतदानाच्या पहिल्या तासात ६५ आमदारांनी मतदान केलं आहे. यामध्ये भाजपाच्या ५० तर राष्ट्रवादीच्या १५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार,’ अनिल बोंडे यांचं सूचक ट्वीट

"काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा," असं सूचक ट्वीट अनिल बोंडे यांनी केले आहे. बोंडे यांच्या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला असून अनेकजण आपापल्या पातळीवर बोंडे यांच्या ट्वीटचा अर्थ लावत आहेत.

राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांचं मतदान पूर्ण

मंत्री छगन भुजबळ विधानभनात पोहोचले आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात पोहोचले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात पोहोचले आहेत. तसेच शिवसेना आमदारांची बसही विधानभवनात दाखल झाली आहे. सोबतच आदित्य ठाकरेंसह एकनाथ शिंदे आणि इतर नेतेही विधानभवनात पोहोचले आहेत.

मतदानावर फडणवीसांचं बारिक लक्षं

देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मतदान लवकर पूर्ण करण्याची भाजपची स्ट्रॅटेजी, मतदान शांततेने आणि लक्षपूर्वक करण्याच्या आमदारांना सूचना फडणवीसांनी आपल्या आमदारांना केल्या आहेत.

नाना पटोलेंचा भाजपवर हल्ला

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "ज्यांचा गर्व वाढलाय त्यांचा गर्व खाली घेण्याचा आजचा दिवस आहे." असा टोला पटोलेंनी भाजपला लगावला आहे. (Legislative Council elections Latest News)

भाजपकडून मतदानासाठी चोख बंदोबस्त

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी भाजपकडून संजय कुटे, अतुल भातखळकर आणि आशिष शेलार हे भाजपचे पोलिंग एजंट म्हणून भूमिका पार पाडत आहेत.

राष्ट्रवादीसाठी अजित पवारांकडून स्वतः खबरदारी

प्राजक्त तनपुरे, अनिल पाटील, संजय बनसोडे राष्ट्रवादीचे पोलिंग एजंट म्हणून भूमिका बजावत आहे. तर मतदानासंदर्भात अजित पवारांकडून स्वतः खबरदारी घेण्यात येत आहेत.

९ वाजता मतदानाला सुरवात

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार हरिभाऊ बागडेंनी पहिलं मतदान केलं आहे.

भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात थेट लढत!

राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेसच्या (Congress) भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यामध्ये होणार आहे. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. यात भाई जगताप यांची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जात आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांची जागा काँग्रेसकरता प्रतिष्ठेची मानली जात आहे.

अपक्षांची भूमिका महत्वाची!

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक: 10 जागांसाठी आज मतदान, अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार बजावणार निर्णायक भूमिका.

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक चुसशीची झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेनेनं सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली गेली आहे.

जागा १० उमेदवार ११ कुणाची विकेट पडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : दादर माहिममध्ये महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT