मुंबई : विधान परिषदेच्या १० जागेसाठी आज सोमवारी (२० जून) ला मतदान सुरू झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि भाजप या दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासोबतच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं जोरदार सुरु झालं आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "ज्यांचा गर्व वाढलाय त्यांचा गर्व खाली घेण्याचा आजचा दिवस आहे." असा टोला पटोलेंनी भाजपला लगावला आहे. (Legislative Council elections Latest News)
हे देखील पाहा -
भाजपवर टीका करताना नाना पटोले म्हणाले की, आघाडीच्या मतांच समीकरण झालं आहे. आमचे सहाही उमेदवार बहुमताने निवडून येतील. मात्र, गर्व आणि अतिमहत्त्वाकांक्षा, पैसा, केंद्रीय तपासयंत्रणा यामुळे भाजपला गर्व आला आहे. भाजपचा तो गर्व आज खाली येणार आहे असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक चुसशीची झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेनेनं सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली गेली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेसच्या (Congress) भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यामध्ये होणार आहे. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. यात भाई जगताप यांची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जात आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांची जागा काँग्रेसकरता प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाई जगताप दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असल्याने त्यांची मदार प्रेफरन्शीअल वोटींग आणि अपक्ष यांवर असणार आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ ४४ आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.