Legislative Council Election Pankaja Munde Not Get Ticket, Pankaja Munde Latest News, Beed News Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी: पंकजा मुंडेंचा विधानपरिषदेतून पत्ता कट! यंदाही उमेदवारी नाहीच

Legislative Council Election Pankaja Munde Not Get Ticket : भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) संधी मिळू शकलेली नाही. भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पाच उमेदवारांमध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे. पंकजा मुंडेंना विधान परिषद निवडणुकीसाठी संधी देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, भाजपने पंकजांना संधी दिली नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडेंची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pankaja Munde Latest News)

हे देखील पाहा -

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस हे देखील पंकजा मुंडे यांच्या विधानपरिषदेतील उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यसभेपाठोपाठ पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेत जाण्याची संधीही हुकली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच लक्षं लागलेलं आहे.

या दिवशी होणार मतदान

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. या १० जागांपैकी भाजपकडे ४ जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी २-२ आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.

चित्रा वाघ यांनाही संधी नाही

पंकजा मुंडे यांच्यासह चित्रा वाघ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. मात्र भाजपाने श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या रुपाने नव्या चेहऱ्यांना संधी देत एकप्रकारे दिग्गज नेत्यांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून निर्णय मान्य करायचा असतो - चंद्रकांत पाटील

याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की,आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळी कोरी पाकीटं असतो. जो पत्ता लिहील तो जात असतो. त्यामुळे राजकारणात काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय हा संघटना करते. विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. पंकजा ताईंची उमेदवारी व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

भाजपच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्ये:

१. संघटनेत काम करणाऱ्या दोन उमेदवारांना भाजपने संधी दिली आहे. यामध्ये उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देऊन भाजपने कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.

२. भाजपने घटक पक्षाला उमेदवारी नाकारली. सदाभाऊ खोत, विनायक मेंटेना संधी नाही.

३. पंकजा मुंडे की चित्रा वाघ या चर्चेत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी.

४. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेत मनसेचं एकमेव मत भाजपला मिळणार? आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेले. विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणं टाळलं, त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना कुठली संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

५. पराभूत झालेल्या राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात आलं, ओबीसी चेहरा म्हणून संधी.

६. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT