Gunaratna Sadavarte Petition against Maharashtra Bandh Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Bandh: मोठी बातमी! महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; गुणरत्न सदावर्ते विरोधकांवर खवळले

Gunaratna Sadavarte Petition against Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखली केली आहे.

Satish Daud

Maharashtra Bandh Updates: बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने देखील सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून उद्या म्हणजेच शनिवारी (ता २४) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातील सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. अशातच महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखली केली आहे.

महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर महाविकास आघाडी हा बंद पुकारत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून कुणालाही महाराष्ट्र बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा दावाही या याचिकेतून करण्यात आलाय.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत इतरांनी देखील महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी कोर्टात तशी बाजूही मांडली आहे. दरम्यान, याबाबत कायदा स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? तुमची भूमिका स्पष्ट आहे तर यात कोर्टाला का खेचताय? असा सवालही हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय.

वकील गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

मुंबईत माध्यमांसोबत बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "बदलापूर लहान मुलींवर झालेले अत्याचार निंदनीय आहेत. या अपराध करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. 20 तारखेला ज्या राजकीय अपप्रवृत्तींनी मुंबईला वेठीस धरलं होतं, त्याच प्रकारचा 24 तारखेचा बंद आहे. याबाबत आम्ही खेरवाडी पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दाखल केली आहे".

"दुधाच्या गाड्या असतील शाळा असतील, रिक्षा टॅक्सी असतील या चालू राहिल्या पाहिजेत. बंद बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. अडीच वाजता न्यायालयाने सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे. लहान बाळांवर झालेल्या अत्याचारांवर राजकारण करणे आपली संस्कृती नाही. हा बंद राजकीय हेतूने करण्यात येतोय", असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT