मुंबई/पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका तयार होणार? प्रशासकीय हालचालींना वेग, कसं असेल कार्यक्षेत्र?

Third Municiple Corporation In Pune : विभागीय आयुक्तांनी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद, तीनही नगरपरिषद,पीएमआरडीए ला लोकसंख्या,क्षेत्रफळ,हद्दीचा सविस्तर अहवाल तात्काळ मागविण्यात आला आहे.

रोहिदास गाडगे

Pune News :

पुणे जिल्ह्यात आता तिसरी महापालिका तयार करण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. विभागीय आयुक्तांकडून खेड तालुक्यातील आळंदी,चाकण, राजगुरुनगर नगरपरिषद आणि लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या गावांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि हद्दीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने तातडीने अहवाल मागवण्यात आला आहे.

आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर आणि लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील गावांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र याला स्थानिक नेत्यांच्या विरोध झाला, त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका समाविष्ट होण्यापेक्षा स्वतंत्र महापालिकेची मागणी करण्यात आली आहे. याच मागणीवरुन आता पुणे जिल्ह्याला तिसरी महापालिका करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. (Latest Marathi News)

विभागीय आयुक्तांनी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद, तीनही नगरपरिषद,पीएमआरडीए ला लोकसंख्या,क्षेत्रफळ,हद्दीचा सविस्तर अहवाल तात्काळ मागविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याची घोषणा होणार का हे पहावे लागणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महापालिका सभाव्य कार्यक्षेत्र कसे असेल?

आळंदी नगरपरिषद

चऱ्होली, मरकळ, सोळु, केडगाव, वडगाव घेणंद

चाकण नगरपरिषद

निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, महाळुंगे, खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वराळे, आंबेठाण, शिंदे, सावरदरी, भांबोली, वासुली, बिरदवडी, वाकी

राजगुरुनगर नगरपरिषद

राक्षेवाडी, चांडोली, शिरोली, सातकरस्थळ, भांबुरवाडी, तिन्हेवाडी या गावांचा समावेश केल्यास लोकसंख्या आणि हद्द क्षेत्रफळ महापालिका होण्यासाठी योग्य राहिल का? याची प्रशासकीय पातळीवर पडताळणी सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT