Indapur Pune sons assault elderly parents over land dispute saam tv
मुंबई/पुणे

आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

Two Sons Beat Elderly Parents: इंदापूरच्या तरंगवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन मुलांनी वृद्ध आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.

Bharat Jadhav

  • इंदापूरच्या तरंगवाडी येथे दोन मुलांनी वृद्ध आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

  • प्राथमिक माहितीनुसार, आईच्या नावाची जमीन विकल्यावरून कौटुंबिक वाद झाला.

  • दोन्ही मुलांनी आई-वडिलांना दांडक्याने मारहाण केल्याची माहिती

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक संतापजनक घटना घडलीय. दोन मुलांनी भररस्त्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण केली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी दोन्ही मुलांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आलाय. ज्या आई-विडिलांनी आयुष्यभर कष्ट करून मोठं केलं, त्याच आई-वडिलांना दोन भावांनी दांडक्याने मारहाण केली. या घटनेचा हादरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

इंदापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जमिनीच्या वादातून मुलांनी आपल्या आई-वडिलांना मारहाण केलेली आहे या दोघांनी विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने मारहाण करणं चुकीचा आहे त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी दिलीय.

नेमकं काय घडलं?

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील ही घटना आहे. दाम्पत्याला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, यात आई-वडील रोडवर पडल्याचे दिसत आहेत. त्यांच्यामागे एक पांढऱ्या रंगाची कार उभी आहे. दोन मुलं उभी आहेत. या दोघांपैकी एकाच्या हातात काठी दिसत आहे. याच काठीने तो आपल्या वडिलांना मारत आहेत. तर दुसरीकडे बाजूला बसलेली आई आपल्या मुलांना ‘माझ्या नवऱ्याला मारू नका रे’ अशी विनवणी करताना दिसतेय.

मिळालेल्या माहितीनुसार मुलांनी जमिनीच्या वादातून बापाला मारलं आहे. आईच्या नावावर असलेली जमीन विकल्याने मुलांनी वडिलांना रागाच्या भरात मारल्याचं सांगितलं जातंय. ही घटना घडल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती.. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

SCROLL FOR NEXT