Lalbaugcha Raja 2023 First look Saam tv
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja 2023 First look: ही शान कुणाची...लालबागच्या राजाची! पाहा पहिली झलक; यंदा देखावा खास

मुंबईतील प्रसिद्ध लागबागच्या राजाचं प्रथम दर्शन आजपासून गणेशभक्तांना करता येणार आहे

Vishal Gangurde

लागबागच्या राजाचं प्रथम दर्शन 2023:

मुंबईतील प्रसिद्ध लागबागच्या राजाचं प्रथम दर्शन आजपासून गणेशभक्तांना करता येणार आहे. आता पुढील दहा दिवस गणेशभक्तांना दर्शन घेता येणार आहे. यंदा लालबागच्या राजा गणेश मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा आहे. (Latest Marathi News)

राज्यात गणेशोत्सव आता १९ सप्टेंबरपासून पुढील १० दिवस मोठ्या दिमाखात पाहायला मिळणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची झलक आजपासून पाहायला मिळणार आहे.

लालबागच्या राजाची जगभर किर्ती आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १९३४ पासून गणेशोत्सवाला सुरुवात केली. मुंबईतील कोळी समुदायाने या मंडळाची स्थापना केली आहे. हे ऐतिहासिक मंडळ गेल्या ९० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो गणेशभक्तांची रांग पाहायला मिळते.

असा आहे लालबागच्या राजाचा इतिहास

लालबागमधील कोळी समुदायाने १२ सप्टेंबर १९३४ रोजी सार्वजनिक गणेशोत्सव करायला सुरुवात केली. लालबागमधील या मंडळाने लालबाग मार्केटमध्ये गणपती बसायला सुरुवात केली. तोच गणपती संपूर्ण मुंबई लालबागचा राजा या नावाने प्रसिद्ध झाला.

यंदा लालबागच्या राजाचं ९० वे वर्ष

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा पाहायला मिळणार आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं ३५० वे वर्ष आहे. तर लालबागच्या राजाचं ९० वे वर्ष आहे. राज्याभिषेकाचा देखावा हा जेष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कलात्मकतेने साकारण्यात आला आहे. दरवर्षी नितीन देसाईच लालबागच्या राजाचा देखावा साकारायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

Shocking: धक्कादायक! पोलिसाच्या गाडीने तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू; ASI आणि कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

SCROLL FOR NEXT