मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज केंद्र सरकार लावत आहे त्यावरुण खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यांमुळे संभाव्य तिसरी लाट केंद्र सरकार (Central Goverment) सांगत आहे त्या प्रमाणात आलीच तर ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता होऊ शकते आणि जर आपणाला 700 मेट्रीक टनाच्या वरती ऑक्सिजनची गरज भासली तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लॉकडाऊन (Lockdown) करावा लागेल, निर्बंध लावावे लागतील असं मतं आज आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलं आहे. Lack of oxygen will cause lockdown
पहा व्हिडीओ-
केंद्राने लस पुरवठा वाढवावा
तसेच आपण सध्या 12 लाखाच्या वरती लसीकरण (Vaccination) करत असून 15 ते 20 लाखापर्यंत दिवसाला लसीकरण करण्याची आपली तयारी आहे, मात्र यासाठी केंद्र सरकारने लसींचा साठा वाढवायला हवा असही ते म्हणाले. लसीककरण झाल्यानंतर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली तरी तिचा संसर्ग कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळे आपण तिसरी लाट थोपवू शकतो त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचही ते म्हणाले. तसेच सध्या ऑक्सिजन निर्मिती 1400 मेट्रिक टन पर्यंत पोहचली आहे तसेच ऑक्सिजनचे नवे 250 प्लँट तयार केले असून 2000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा आपला मानस असल्याचही राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं
नियम न पाळल्यास संसर्ग होणार
सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसंच सर्व उत्साही तरुण कार्यकर्त्यांनी गर्दी टाळावी आणि कोरोना नियमांचे पालन करावे सध्या उत्सवांचा काळ आहे त्यामुळे आपण गर्दीत न जाण्याचा प्रयत्न करावे तसेच नियमांचे पालन केले तर संसर्ग होणार नाही असही ते म्हणाले.
गणेशोत्सवात निर्बंध नाहीत
गणेशोत्सवात निर्बंध वाढविण्याच्या बाबतीत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री अद्याप या विचारात नसल्याचही टोपे यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.