Lab Grown Diamond Report Saam tv
मुंबई/पुणे

Lab Grown Diamond Report: प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे टिकाऊ नसतात; रिपोर्ट काय सांगतो?

साम टिव्ही ब्युरो

Lab Grown Diamond News: 'हिरा है सदा के लिए' असं म्हटलं जातं आहे. मात्र प्रयोगशाळेत तयार केलेले सर्व हिरे टिकाऊ नसतात आणि त्यांना प्रचंड प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. जमिनीखाली कार्बनचे अनेक अणू एकत्र येऊन त्यांच्यावर उच्च तापमान आणि दाब पडतो आणि त्यातून हिरा बनतो. अशीच प्रक्रिया करुन प्रयोगशाळेत हिरे बनवले जातात मात्र टिकाऊ नसतात, असं एका रिपोर्ट मधून समोर आलं आहे. (Latest Marathi News)

NDCचे सीईओ डेविड किली यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, प्रयोगशाळेत तयार केल्या जाणाऱ्या कृत्रिम हिऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. अशा प्रकारचे 60 टक्क्यांपेक्षा जास्त हिरे हे चीन (China) आणि भारतात उत्पादित केले जातात. याठिकाणी वीज निर्मितीसाठी कोळशाचा वाटा अनुक्रमे 63% आणि 74% आहे.

नैसर्गिक हिरे उद्योगाचा भारतात कसा सकारात्मक प्रभाव पडतो, याची लोकांना जाणीव असणे महत्त्वाचे आहे. या विश्‍लेषणाचा उद्देश विश्वासार्ह थर्ड पार्टी डेटा एका डॉक्यमेंटमध्ये एकत्र आणणे हा आहे, असं डेविड किली यांनी म्हटलं.

प्रयोगशाळेत कृत्रिम हिऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असताना जगात नैसर्गिक हिऱ्यांच्या भविष्याविषयी किली म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की दोन्ही प्रकारचे हिरे वेगवेगळ्या ग्राहकांची स्वतंत्र गरज आहेत.

अमेरिकेत कृत्रिम हिऱ्यांची बाजारपेठ जुनी आहे. त्यामुळे तेथील ग्राहक अधिक परिपक्व आहेत. कृत्रिम हिरे आणि नैसर्गिक हिऱ्यांच्या विक्रीत कोरोनानंतर वाढ झाली आहे, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं आहे.

कृत्रिम की नैसर्गिक हिऱ्यांमधील गुंतवणूक फायदेशीर यावर बोलताना किली म्हणाले की 2016-23 च्या तुलनेत 1.5 कॅरेट प्रयोगशाळेत उगवलेल्या हिऱ्याची सरासरी किंमत 74% पेक्षा कमी झाली आहे. नैसर्गिक हिऱ्याच्या किमतीतही चढ-उतार होत असताना, गेल्या 35 वर्षांमध्ये, ते दरवर्षी सरासरी 3 टक्क्यांनी वाढले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

Video : ''कोणाला खुमखुमी असेल तर..'', राऊतांचा कॉंग्रेस नेत्यांना थेट इशारा

Vasant More : वसंत मोरे विधानसभेच्या मैदानात, पुण्यातील 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार? भाजपचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT