KPIT Technologies co-founder Ravi Pandit passed away in Pune, leaving behind a remarkable legacy in the global technology industry. साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित काळाच्या पडद्याआड, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान

KPIT Technologies Co-Founder Ravi Pandit Passes Away : KPIT टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Akshay Badve

Ravi Pandit KPIT Technologies death news : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती, KPIT टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे आज निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रवी पंडित हे पुण्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व होते. त्यांनी KPIT टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील वाहननिर्मिती कंपन्यांना सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली KPIT कंपनीने मोठी प्रगती केली असून, पंडित यांनी फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीतही स्थान मिळवले होते. रवी पंडित यांच्या निधनाने उद्योग विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रवी पंडित हे चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांनी आपल्या कल्पकतेने KPIT टेक्नॉलॉजीजला जागतिक उंचीवर नेऊन ठेवले. ही कंपनी आज जगभरातील मोठ्या वाहननिर्मिती कंपन्यांना प्रगत सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरवते. त्यांच्या याच नेत्रदीपक कामगिरीमुळे फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीतही त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. रवी पंडित हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांनी पुण्यातून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर जागतिक स्तरावर आपल्या ठसा उमटवला.

केवळ व्यवसायच नव्हे, तर पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. 'पुणे इंटरनॅशनल सेंटर'च्या (PIC) माध्यमातून त्यांनी शहराच्या धोरणात्मक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे उद्योग विश्वासह पुणे शहराची मोठी हानी झाली आहे. पंडित यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुण्यातील उद्योग जगतातून हळहळ व्यक्त होत असून, अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर' (MCCIA) चे माजी अध्यक्ष राहिलेल्या पंडित यांनी 'फिनोलेक्स केबल्स लिमिटेड'च्या संचालक मंडळावरही आपली सेवा दिली आहे. भारत सरकारच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च प्रोग्राम कमिटीच्या (CAR) 'कोअर ग्रुप'चे ते सदस्य होते. तंत्रज्ञान विभागाच्या 'टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड'मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रवी पंडित यांना पर्यावरण, तंत्रज्ञान आणि अधिक शाश्वत जगासाठीच्या सामाजिक धोरणांमध्ये विशेष रस होता. त्यांनी ‘Leapfrogging to Pole-vaulting: Creating the Magic of Radical yet Sustainable Transportation’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे सह-लेखन देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठा पक्षप्रवेश! 25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंचा 'मविआला' हादरा

Ratnagiri: गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरी पुन्हा हादरली, १३ वर्षीय मुलाच्या हाताची बोटं तुटली

कर्जतहून पनवेलला अवघ्या काही मिनिटांत पोहोचणार; नव्या रेल्वे मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

तुम्हाला लागलीय का RBI ची लॉटरी? RBIची 'लॉटरी' लागल्याचा ईमेल आलाय?

SCROLL FOR NEXT