Pimpri Chinchwad Crime News
Pimpri Chinchwad Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Crime News: कोयता गँगचा हैदोस सुरूच; दुकानात घुसून व्यापाऱ्याला लुटमार करत मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक वृ्त्त समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोयता गँगने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. या कोयता गँगच्या व्यापाऱ्याला लुटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणवीर आला आहे. (Latest Marathi News)

पिंपरी-चिंचवड (Pimpri-chinchwad) शहरात कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने व्यापा-या मध्ये दहशत निर्माण आहे. खंडणीसाठी दुकानदाराना धमकावण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरात नागिरकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगने व्यापाऱ्याला लुटल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी देण्यास नकार दिल्याने कोयता गँगने त्यांच्या दुकानात घुसून तोडफोड करत लुटमार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी गावातील मेडीमार्ट दुकानातील हे सीसीटीव्ही दृश्य आहेत.

सीसीटीव्हीतून समोर आले की, हातात धारदार कोयते घेऊन आठ ते दहा गाव गुंड दुकानात घुसून तोडफोड करताना दिसत आहेत. या गाव गुंडांनी दुकानं मालकालाही मारहाण केली. या मारहाणीत व्यापारी गंभीररित्या जखमी झाला आहे. मारहाण केल्यानंतर या गुंडांनी लुटमारही केली आहे.

दरम्यान, हे प्रकार थांबावेत म्हणून व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे या आधीही मागणी केली होती. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांचा कुठलाही धाक उरला नसल्याने शहरातील गुन्हेगार अशा पद्धतीने धुडगूस घालत असल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT