Kopar building collapse Saam tv
मुंबई/पुणे

Kopar Building Collapse: कोपरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; परिसरातील नागरिकांमध्ये घबराट

Kopar building collapse: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Dombivli News:

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. कोपर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मण पावसे असे इमारतीचे नाव आहे. इमारतीच्या भाग कोसळल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी नसल्याची माहिती हाती आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरमधील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली आहे. लक्ष्मण पावसे या इमारतीचा भाग कोसळल्यावर आठ कुटुंबीयांना इमारतीबाहेर काढले. या इमारतीच्या भाग कोसळल्याचेही व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी नाही.

इमारत कशी कोसळली?

डोंबिवलीच्या कोपरमधील दुमजली इमारत कोसळली आहे. या इमारतीत काही कुटुंब राहत होती. इमारत कोसळण्याचे संकेत मिळताच या कुटुंबाना इमारतीबाहेर काढण्यात आले. यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

लक्ष्मण पावसे नावाची ही इमारत चाळीस वर्षांपूर्वी लोडबेअरींग पद्धतीने बांधण्यात आली होती. या इमारतीत एकूण ९ घरे होती. इमारतीचे काँक्रीट हळूहळू पडू लागल्याने रहिवाशी जीव मुठीत धरून पळू लागले.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. टनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलीस, पोलीस देखील पोहोचले. सध्या इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT