
अक्षय बडवे, प्रतिनिधी
ऑनलाईन मैत्रीतून अनेक गंभीर गुन्हे घडत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. पुण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणाला सोशल मीडियावरील ओळख चांगलेच महागात पडली. या तरुणाचे अपहरण करुण त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी १९ वर्षीय तरुण हा तळेगाव (Talegaon) दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या तरुणाची एका मोबाईल ॲपवरुन आरोपींशी ओळख झाली होती. आराेपींनी त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बाेलावले.
ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारजवळ तो तरुण आल्यावर त्याला बोलण्यात गुंतवून या आरोपींनी त्याला फिरायला जाऊ म्हणत गाडीत बसण्यास सांगितले. तसेच भाेसरी एमआयडीसी परिसरात एका निर्जन जागी आरोपींनी त्याला नेले आणि त्याचवर अनैसर्गिक कृत्य केले.
आरोपींनी या तरुणााला धमकावून ऑनलाइन पद्धतीने त्याच्या खात्यातील २८ हजार ५०० रुपये देखील काढून घेतले. त्यानंतर तरुणाला साेडून तिघेजण माेटारीतून पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत त्या तरुणांनी पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी तरुणाने बंडगार्डन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.